![]()
पुणे शहरातील शिवाजीनगर न्यायालयासमोर भरदिवसा एका तरुणावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी शहरातील सराइतांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या भागात विशेष मोहिम (कोम्बिंग ऑपरेशन) राबवून सराइतांची चौकशी केली. नाकाबंदी करुन संशयि
.
‘शिवाजीनगर न्यायालयासमोर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी गेल्या दोन दिवसात खून, खूनाचा प्रयत्न, तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केल्यानंतर जामीन मिळवून बाहेर आलेल्या सराइतांची तपासणी केली. मकोका कायद्यातंर्गत कारवाईत जामीन मिळवलेल्या १८१ सराइतांची तपासणी केली, तसेच खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गु्न्हा दाखल असलेल्या १५१ सराइतांची चौकशी केली. वेगवेगळ्या गुन्ह्यात जामीन मिळवून बाहेर आलेल्या ५२९ जणांची तपासणी केली. ते वास्तव्यास असलेल्या भागात जाऊन पोलिसांनी त्यांची चौकशी केली. पोलिसांनी शहरातील ७१ ठिकाणी विशेष मोहिम राबविली. ४१ ठिकाणी नाकाबंदी करुन वाहन चालकांची तपासणी करण्यात आली. शहरातील संवेदनशील भागात पायी गस्त घालण्यात येत आहे’, अशी माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.
पोलिसांनी बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या ३१ जणांना अटक केली असून, शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात ६५ गुन्हे दाखल केले आहेत. कोयते, पिस्तूल अशी ६८ शस्त्रे जप्त केली आहेत. अमली पदार्थ विक्री प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थ विक्री प्रकरणातील सराइतांची चौकशी करण्यात आली. पुणे शहरातून तडीपार केल्यानंतर पुन्हा शहरात आलेल्या सात सराइत आरोपीना पोलिसांनी अटक केली.