Headlines

नाशिकमध्ये प्रोटोकॉलवरून महायुतीत जुंपली: भुजबळ-दराडे वाद पुन्हा उफाळला; शासकीय कार्यक्रमांत डावलले जात असल्याची दराडेंची तक्रार



नाशिक जिल्ह्यात विकासकामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमांत प्रोटोकॉलनुसार नावे टाकली जात नसल्याने सत्ताधारी आमदार आणि विरोधी खासदारांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार केली आहे. जिल्हा नियोजन बैठकीत हा मुद्दा चांगलाच गाजला असून, य

.

येवला तालुक्यासह जिल्ह्यातील शासकीय कार्यक्रमांत लोकप्रतिनिधींना डावलले जात असल्याचा आरोप करत आमदार किशोर दराडे आणि शरद पवार गटाचे खासदार भास्कर भगरे यांनी थेट मंत्री भुजबळ यांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला. या प्रकारामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून वातावरण चांगलेच तापले आहे.

अधिकाऱ्यांवर दबाव आणि बदलीच्या धमक्यांचा आरोप

मंत्री छगन भुजबळ हे अधिकाऱ्यांना बदलीच्या धमक्या देऊन व दबाव आणून येवल्यातील कार्यक्रमांतून लोकप्रतिनिधींची नावे जाणूनबुजून वगळत असल्याचा गंभीर आरोप आमदार किशोर दराडे यांनी केला आहे. येवल्यात सुडाचे राजकारण केले जात असून, यापुढे अधिकाऱ्यांनी दबावाखाली येऊन प्रोटोकॉल मोडल्यास त्यांच्याविरोधात हक्कभंग आणू, असा थेट इशाराही दराडे यांनी दिला आहे.

खासदार भगरेंचे लेखी निवेदन

आम्ही विरोधी पक्षात असलो तरी जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहोत आणि लोकांच्या कामांसाठी प्रयत्नशील असतो, अशी भूमिका खासदार भास्कर भगरे यांनी बैठकीत मांडली. अधिकाऱ्यांच्या या मनमानी कार्यपद्धतीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करत त्यांनी जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांना यासंदर्भात लेखी निवेदनही सादर केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *