Headlines

बदलापुरात भटक्या कुत्र्याचा पाठलाग जीवावर बेतला: पळताना हृदयविकाराच्या धक्क्याने 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू, शनिनगर परिसरातील धक्कादायक घटना – Badlapur Youth Dies After Stray Dog Chase



बदलापूर शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत असून, अशाच एका धक्कादायक घटनेत 18 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भटक्या कुत्र्यापासून जीव वाचवण्यासाठी पळत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने या तरुणाने प्राण गमावले. एकीकडे पालिका प

.

हर्षल शिंदे असे मृत तरुणाचे नाव असून तो बदलापूर पश्चिमेकडील शनिनगर परिसरात आपल्या मित्रांना सोडण्यासाठी गेला होता. यावेळी तिथला एक भटका कुत्रा हर्षल आणि त्याच्या मित्रांच्या अंगावर धावून आला. कुत्र्याच्या भीतीने हर्षलने जीवाच्या आकांताने पळ काढत जवळच्या एका दुकानात आश्रय घेतला. मात्र, या धावपळीत त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला.

हृदयावरील शस्त्रक्रिया आणि ताणामुळे ओढावला मृत्यू

हर्षलवर तीन वर्षांपूर्वीच हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती. कुत्र्याला घाबरून अतिशय वेगाने पळाल्यामुळे त्याच्या हृदयावर मोठा ताण आला आणि त्यातूनच त्याला तीव्र झटका आल्याची माहिती बदलापूर ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली. या घटनेची गंभीर दखल घेत, भटक्या कुत्र्यांच्या समस्येतून बदलापूरकरांची लवकरात लवकर सुटका करू, असे आश्वासन नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी दिले आहे.

15 हजार भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर

सध्या बदलापूर शहरात सुमारे 15 हजार भटके कुत्रे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरात कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना सातत्याने घडत असून, पालिकेने डॉग शेल्टरच्या माध्यमातून उपाययोजना सुरू केल्या असल्या तरी ही समस्या तात्काळ सुटणारी नाही. प्रशासनाने व्यापक मोहीम राबवून हा प्रश्न कायमचा निकाली काढावा, अशी जोरदार मागणी आता नागरिकांमधून होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *