छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील २२२ रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेबाबत लोकप्रतिनिधी सय्यद उसामा अब्दुल कदीर यांनी प्रशासनाकडे विविध मुद्द्यांवर खुलासा मागितला आहे.
.
महानगरपालिका आणि IBPS यांच्यातील सामंजस्य करारानुसार भरती प्रक्रिया पारदर्शक आणि नियमांनुसार होणे अपेक्षित आहे. मात्र, परीक्षा शुल्क आणि मानधनाची वसुली, Form A / Form 1 आणि Form 2 मधील समान उत्तरांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
२०० पैकी १८० गुण मिळवणाऱ्या उमेदवारांची निवड आणि पुढील परीक्षेसाठी केवळ ४० उमेदवार निवडण्याचे निकष काय होते, याचाही खुलासा मागण्यात आला आहे.
परीक्षा केंद्रांवरील CCTV आणि सुरक्षा व्यवस्था, परीक्षा प्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी, गैरप्रकार आढळल्यास केलेली कारवाई, तसेच मेरिट यादीतील उमेदवारांची पात्रता याबाबत माहिती मागितली आहे. RTI अंतर्गत मिळालेल्या माहितीबाबतही सविस्तर खुलासा करण्याची मागणी आहे.
भरतीतील आर्थिक व्यवहार, परीक्षा पद्धत, गुणांकन, उमेदवारांची निवड आणि संभाव्य गैरप्रकारांची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. संबंधित कागदपत्रांच्या प्रमाणित प्रतीही उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे.
भरती गुणवत्तेच्या आणि पारदर्शकतेच्या आधारावर व्हावी, पात्र उमेदवारांवर अन्याय होऊ नये आणि प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कायम राहावा, अशी भूमिका सय्यद उसामा अब्दुल कदीर यांनी मांडली.
