Headlines

मनरेगाची कुशल देयके थकल्याने शेतकरी संकटात: काँग्रेसचे छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीसमोर आंदोलन; २०२२ ते २०२६ मधील देयके देण्याची आणि जलसंधारणाची कामे सुरू करण्याची मागणी


महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २०२२ ते २०२६ या काळात पूर्ण केलेल्या वैयक्तिक लाभाच्या कामांची कुशल घटकाची देयके चार वर्षांपासून थकली आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. देयके तातडीने द्यावीत आणि दुष्काळी स्थितीवर

.

आंदोलनात खासदार कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, तालुकाध्यक्ष श्रीमंत उकिर्डे, कार्याध्यक्ष विठ्ठल कोरडे आणि विनोद देहाडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले.

शेतकऱ्यांनी सिंचन विहीर, जनावरांचा गोठा, शेततळे, फळबाग, वृक्षलागवड आणि घरकुलाची कामे उसनवारी किंवा उधारीवर पैसे घेऊन पूर्ण केली. मात्र, देयके थकल्याने उधारी कशी फेडायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

आंदोलकांनी २०२२ ते २०२६ या काळातील कुशल घटकाच्या देयकांचा तालुकानिहाय आणि लाभार्थीनिहाय आढावा घेऊन ती तातडीने देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली.

तसेच ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेतून नाला खोलीकरण, नाला बांध, शेततळी, पाणी अडवणे आणि जमिनीत मुरवणे, तसेच मृद व जलसंधारणाची कामे प्राधान्याने सुरू करावीत, अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांना थेट फायदा देणाऱ्या अधिक वैयक्तिक लाभाच्या कामांचा योजनेत समावेश करून कालबद्ध आराखडा तयार करण्याची मागणीही आंदोलकांनी केली.

आंदोलनानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी जगन्नाथ काळे, भाऊसाहेब जगताप, सुरेश शिंदे, अशोक नाबदे, राहुल सावंत, गजानन मते, संतोष शेजुळ, जावेद पटेल, बाबासाहेब मोकळे, सुधाकर कचकुरे, अर्जुन ठोंबरे, बळीराम वाघ, सावता गाडेकर, संदीप शेळके आणि सदाम पठाण उपस्थित होते. शिवमल्हार वाघे मंडळ, जळगाव फेरणचे प्रतिनिधी आणि शेतकरीही सहभागी झाले.

शासकीय योजनांवर विश्वास ठेवून स्वतःच्या पैशातून किंवा उसनवारीने कामे पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांची देयके चार वर्षे थकली आहेत. थकलेली बिले देण्यासोबतच दुष्काळी स्थितीत जलसंधारणाची कामे वेळेत सुरू करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *