Headlines

रस्ता प्रत्यक्ष रुंद झाल्यावरच अतिरिक्त बांधकाम लाभ: पुणे महापालिकेचा निर्णय; प्रीमियम एफएसआय आणि टीडीआरसाठी संपूर्ण रस्ता विकसित करणे बंधनकारक



रस्ता रुंदीकरण केवळ कागदोपत्री दाखवून बांधकाम व्यावसायिकांना प्रीमियम एफएसआय (चटई क्षेत्र निर्देशांक) आणि टीडीआर (हस्तांतरणीय विकास हक्क) यांसारखे अतिरिक्त बांधकाम लाभ घेता येणार नाहीत. रस्ता रुंदीकरणासाठी प्रस्तावित केलेल्या रस्त्याची संपूर्ण लांबी

.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २१० नुसार, महापालिका हद्दीतील अस्तित्वातील सार्वजनिक रस्त्यांची रुंदी वाढविण्याचे प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेने मंजूर केले जातात. मात्र, अनेक ठिकाणी प्रस्तावित रुंदीनुसार प्रत्यक्ष रस्त्यांचे रुंदीकरण केले जात नाही. असे असतानाही केवळ मंजूर रस्ता रुंदीकरणाचा आधार घेऊन बांधकाम व्यावसायिकांकडून एकसमान विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (यूडीसीपीआर-२०२०) अंतर्गत प्रीमियम एफएसआय आणि टीडीआरचे अतिरिक्त लाभ घेतले जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

प्रत्यक्षात रस्ता रुंदीकरण झालेले नसतानाही अतिरिक्त बांधकामांना परवानगी दिल्याने त्या परिसरातील पायाभूत सुविधांवर ताण वाढतो. विशेषतः अस्तित्वातील रस्त्यांवर वाहतुकीचा भार वाढण्याबरोबरच पाणीपुरवठा, मलनिस्सारण आणि अन्य नागरी सुविधांवरही अतिरिक्त ताण निर्माण होतो. त्यामुळे प्रत्यक्ष रस्ता विकसित होण्यापूर्वीच अतिरिक्त बांधकाम लाभ देण्याच्या पद्धतीला आळा घालण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

संपूर्ण रस्ता विकसित करणे बंधनकारक

आयुक्तांच्या परिपत्रकानुसार, २७ नोव्हेंबरनंतर रस्ता रुंदीकरण प्रस्तावित असलेल्या रस्त्यांशी संबंधित नवीन, सुधारित अथवा दुरुस्तीचे बांधकाम प्रस्ताव महापालिकेकडे सादर झाल्यास त्यांना प्रस्तावित रस्त्याच्या रुंदीकरणाच्या आधारे प्रीमियम एफएसआय, टीडीआर किंवा अन्य अतिरिक्त बांधकाम लाभ देता येणार नाहीत. संबंधित रस्त्याची संपूर्ण लांबी प्रस्तावित रुंदीनुसार प्रत्यक्ष जागेवर विकसित झालेली असणे आवश्यक आहे. संपूर्ण रस्ता विकसित होईपर्यंत हे अतिरिक्त लाभ अनुज्ञेय राहणार नाहीत.

या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश शहर अभियंत्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाच्या प्रस्तावांचा आधार घेऊन अतिरिक्त बांधकाम क्षेत्राचा लाभ मिळविण्याच्या प्रक्रियेला आता लगाम बसणार आहे. कागदोपत्री रस्ता रुंदीकरणाऐवजी प्रत्यक्ष रस्ता विकास झाल्यानंतरच बांधकामाचे अतिरिक्त लाभ देण्याचे धोरण महापालिकेने स्वीकारल्याने शहरातील पायाभूत सुविधांच्या नियोजनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *