Headlines

अजिंठा घाटात दुचाकीला वाचवताना ट्रकची डोंगराला धडक: 8 तास कोंडी, दोघे गंभीर, 9 महिन्यांत 21, नोव्हेंबरमध्ये 5 व्यांदा वाहतूक ठप्प



अजिंठा घाटात दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात खत घेऊन जाणाऱ्या ट्रकचा ताबा सुटून थेट डोंगराला जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाल्याची घटना गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असून, घाटात आठ तास वाहतूक कोंडी झ

.

मुंबईहून जळगावच्या दिशेने खत वाहतूक करणारा ट्रक (एमएच २९ बीई १८८८) अजिंठा घाट उतरत असताना एका अरुंद वळणावर अचानक समोर दुचाकी आली. दुचाकीला वाचवताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ट्रक सरळ डोंगराला जाऊन धडकला. या धडकेत ट्रकचे मोठे नुकसान झाले असून चालक शेख इक्बाल शेख गफ्फार (३६, रा. यवतमाळ) आणि क्लिनर नरेश हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ट्रक डोंगराला धडकून रस्त्यावर आडवा झाल्याने इतर वाहनांच्या येण्या-जाण्यास मोठा अडथळा निर्माण झाला. फर्दापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

१० किमीच्या मार्गावर ७ ठिकाणी अरुंद रस्ते घाटातील रस्ता पूर्वी ४० फुटांचा होता. मात्र नाल्यांची कामे आणि संरक्षक कठडे उभारल्याने रस्ता काही ठिकाणी अरुंद झाला आहे. घाटात १० किमीच्या महामार्गावर ७ ठिकाणी अरुंद रस्ते व वळणे असल्याने वाहने बंद पडून अपघात होतात. घाटातील उतार नैसर्गिक असल्याने वाहने सुसाट धावतात. फायबर ब्रेकर, दुभाजक आवश्यक आहे.

ट्रकमध्ये खत असल्यामुळे बाजूला करणे होते कठीण ट्रकमध्ये खताचे वजन अधिक असल्याने तो बाजूला हलवणे कठीण बनले होते. परिणामी घाटात दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी एका बाजूने दहा मिनिटे आणि दुसऱ्या बाजूने दहा मिनिटे याप्रमाणे टप्प्याटप्प्याने वाहने सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहनांची वर्दळ आणि अरुंद मार्ग यामुळे वाहतूक कोंडी पूर्णपणे सुटू शकली नाही. आठ तास ही वाहतूक कोंडी कायम राहिल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला.

घाटाची दुरवस्था; पर्यायी मार्गही अडचणीत अजिंठा घाटातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हळदा घाटाचा पर्यायी मार्ग म्हणून वापर होऊ शकतो. मात्र, हळदा घाटातील मुख्य वळणावर रस्त्याची चाळणी झाली असून, घाटाच्या सुरुवातीलाच चार महिन्यांपासून खडी टाकून ठेवली आहे. अरुंद वळणांमुळे ट्रक, ट्रेलर आणि टँकरसारख्या अवजड वाहनांना या मार्गाने जाणे शक्य होत नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *