![]()
कन्नड-सिल्लोड राज्य महामार्ग क्रमांक १७८ वरील आमदाबाद फाट्याजवळ बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार वडिलांचा मृत्यू झाला, तर त्यांचा १२ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. कारभारी हरसिंग बिघोत (३६, रा. सारोळा) असे मृत व्यक्तीचे न
.
कारभारी बिघोत हे बुधवारी रात्री नाचनवेल चौफुलीवरून आपला मुलगा यश याच्यासह दुचाकी (एमएच २० ईडब्ल्यू ४७६७) वरून सारोळा गावाकडे परतत होते. रात्री दहा वाजेच्या सुमारास आमदाबाद फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात कारभारी बिघोत यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. अपघातात त्यांचा मुलगा यश गंभीर जखमी झाला. त्याला पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. गुरुवारी दुपारी कारभारी बिघोत यांच्या पार्थिवावर सारोळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व भाऊ असा परिवार आहे. पिशोर ठाण्यात अपघाताची नोंद केली आहे. मुलासोबत जेवणाचा आनंद ठरला शेवटचा नाचनवेल चौफुलीवरील एका हॉटेलमध्ये वडील आणि मुलगा जेवणासाठी आले होते. एकत्र वेळ घालवून दोघेही दुचाकीने सारोळा गावाकडे परतत होते. आमदाबाद फाट्याजवळ काळाने घाला घातला आणि या गोड प्रवासाचे दुःखात रूपांतर झाले. जखमी यश सारोळा जि.प. शाळेत इयत्ता सहावीत शिकत असून, पोलिस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.