Headlines

बँक कर्मचाऱ्याची पाच लाखांची रोकड लुटणाऱ्या दोघांना नाशिकमधून अटक: 22 जूनला गणेशवाडीजवळ घडली होती घटना



नवीन कायगावकडे जात असलेल्या बँक कर्मचाऱ्याची ५ लाख रोख रक्कम असलेली पिशवी हिसकावून पळून गेलेल्या चोरी प्रकरणातील दोन आरोपींना गंगापूर पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातून ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

.

२२ जून रोजी ही घटना घडली होती. औरंगाबाद जिल्हा बँकेच्या नवीन कायगाव शाखेत कार्यरत असलेले विठ्ठल जगन्नाथ चव्हाण हे दुचाकीवरून जात होते. त्यावेळी अज्ञात दुचाकीस्वारांनी पाच लाख रोख असलेली पिशवी हिसकावली होती. सायखेडा, ता. निफाड येथून सागर सोमनाथ अहिरे (२४, रा. जळगावफाटा, निफाड) याला मोटारसायकलसह ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदार सिद्धार्थ मनोहर साळवे (२८, रा. सुंदरपूर) आणि अन्य साथीदारांसह गंगापूर हद्दीत बँक कर्मचाऱ्याची रोकड हिसकावल्याची कबुली दिली आहे.

साथीदारांचा शोध सुरू आरोपींनी ओळख लपवण्यासाठी विनाक्रमांकाच्या दुचाकी व चारचाकी वाहनांचा वापर का आणि कसा केला, ही रणनीती तपासाच्या केंद्रस्थानी आहे. अटकेतील आरोपींच्या कबुलीनंतर उर्वरित साथीदार कुठे लपले आहेत आणि लुटलेली रोकड कोणाकडे आहे, याचा शोध घेण्यात येत आहे. दोन दिवसांच्या कोठडीत आरोपींच्या चौकशीतून या टोळीचे इतर संभाव्य गुन्हे आणि रकमेचा माग उघड होण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *