Headlines

46 गावांच्या हक्काच्या पाण्यासाठी खरवंडी कासार येथे महामार्ग रोखला: शेतकऱ्यांचा एल्गार; प्रशासनाच्या आश्वासनानंतर 5 दिवसांचे उपोषण मागे



तालुक्यातील भगवानगड परिसरातील ४६ गावांना जायकवाडी धरणातून पिण्यासह शेतीसाठी हक्काचे पाणी मिळावे, या मागणीसाठी गुरुवारी खरवंडी कासार येथे ग्रामस्थांनी आक्रमक आंदोलन केले. गाव बंद ठेवून कल्याण-निर्मल राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. बैलगा

.

भगवानगड परिसरातील ४६ गावांच्या पाणीप्रश्नासाठी प्रा. कीर्तने यांच्या मार्गदर्शनाखाली खरवंडी कासार येथे बेमुदत उपोषण सुरू होते. अॅड. प्रताप ढाकणे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत केवळ आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार, असा सवाल केला. ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी आंदोलनाला पाठिंबा देत ४६ गावांचा पाणीप्रश्न हा जगण्याचा प्रश्न असल्याचे सांगितले. प्रशासनाच्या वतीने तहसीलदार डॉ. उद्धव नाईक, गटविकास अधिकारी राजेंद्र धस, जलसंपदा व जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. अखेर अॅड. ढाकणे आणि प्रा. हाके यांच्या उपस्थितीत प्रा. कीर्तने यांना पाणी देऊन उपोषण सोडण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *