![]()
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अध्यापनाचे धडे देणाऱ्या मिस सिंथिया फॅरार यांच्या शैक्षणिक वारशाशी जोडलेल्या क्लेरा ब्रूस हायस्कूल फॉर गर्ल्स आणि अहमदनगर बोर्डिंग हायस्कूल या दोन ऐतिहासिक शाळा बंद करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. परंतु, प्रशासन मंड
.
अमेरिकन मराठी मिशनने १८२८ मध्ये महाराष्ट्रात शैक्षणिक कार्य सुरू केले. १८३८ मध्ये मुलींसाठी शाळेची स्थापना झाली. तत्कालीन अहमदनगरमध्ये मिस् सिंथिया फॅरार यांनी शिक्षणप्रसारात मोलाचे योगदान दिले. पुढे १८८२ मध्ये अहमदनगर बोर्डिंग हायस्कूलची स्थापना झाली. या दोन्ही संस्था महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षण आणि आधुनिक शिक्षणाच्या इतिहासातील महत्त्वाचे टप्पे मानल्या जातात. इतिहासप्रेमी मंडळाने मिस् सिंथिया फॅरार यांच्या कबरीचा शोध घेतल्याने या वारशाच्या जतनाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला. यासंदर्भात रेव्ह. जी. आर. वाघमारे, माजी विद्यार्थिनी संध्या मेढे, निवृत्त समाजकल्याण अधिकारी रफिक मुन्शी, इतिहासप्रेमी मंडळाचे भैरवनाथ वाकळे, इंजि. अभिजीत एकनाथ वाघ, आसिफखान दूलेखान आदींनी जिल्हा प्रशासन व जि.प. प्रशासनाला पत्र दिले आहे.शिक्षकांची कमतरता, शिक्षक समायोजन, वेतनाचे प्रश्न, घटती विद्यार्थिसंख्या आणि शैक्षणिक सुविधांचा अभाव यामुळे दोन्ही शाळांची अवस्था खालावल्याचा आरोप अभियानाने केला आहे. याबाबत शाळा बचाव समितीचे भैरवनाथ वाकळे म्हणाले, या शाळांचे ‘हेरिटेज बेस्ड मॉडेल स्कूल’मध्ये रूपांतर करून इमारतींचे जतन करावे, तसेच ग्रंथालय, प्रयोगशाळा, क्रीडा सुविधा आणि आधुनिक शिक्षण व्यवस्था विकसित करावी, असे अभियानाने सुचवले आहे. शासन म्हणून आम्ही जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. या शाळेत आजही विद्यार्थी आहेत, गुरुवारी संविधान दिन या ठिकाणी उत्साहात साजरा झाला. यावेळी शिक्षिका स्मिता शरद नाईक व अनुपमा पवार उपस्थित होत्या.
प्रशासन शाळा बंद करण्याच्या तयारीत! जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने एक सुधारित आदेश काढला. त्यानुसार क्लेरा ब्रूस हायस्कूल फॉर गर्ल्स आणि अहमदनगर बोईज हायस्कूल यांची संच मान्यतेत सन २०२५-२६ मध्ये मंजूर शिक्षक संख्या शून्य झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात आले आहे. त्यानंतर शाळांचे अभिलेखे हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले आहेत. माध्यमिक जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेचे अभिलेखे नेवासे तालुक्यातील रुरल हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय वडाळा मिशन येथे हस्तांतरित करून अहवाल मागितला आहे.