![]()
मोहोळ तालुक्यातील देगाव येथील हनुमंत जाधव यांनी रस्ता खुला करून देण्याच्या मागणीसाठी सुरू केलेल्या उपोषणाचा गुरुवारी दुसरा दिवस होता. मात्र दुसऱ्या दिवशीही कोणताही अधिकारी उपोषणस्थळी न आल्याने ग्रामपंचायत व प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर त्यांनी तीव्र ना
.
देगाव येथील हनुमंत जाधव यांच्या म्हणण्यानुसार, २०२५ मध्येही त्यांनी याच प्रश्नासाठी आंदोलन केले होते. त्यावेळी ग्रामसेवक व सरपंच यांनी रस्ता खुला करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, वर्ष उलटून गेले तरी प्रत्यक्षात रस्त्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. ग्रामपंचायतीकडे वारंवार पाठपुरावा करूनही उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. रस्त्यावरून मुलाला शाळेत जातानाही अडवले जात असल्याने कुटुंबाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायत जनतेच्या सेवेसाठी असून पण न्याय मिळत नाही, असा आरोप जाधव यांनी केला.
उपोषणस्थळी बैल घेऊन आल्याबाबत बोलताना, हे बैल कोणालाही हात लावू देत नसल्याने त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार, म्हणून स्वतःसोबत आणल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामसेवक बाहेरगावी गेले असून गटविकास अधिकारी सुटीवर असल्याचे सांगण्यात येत असल्याने प्रशासनाकडून टाळाटाळ होत आहे, असे जाधव यांनी सांगितले.