Headlines

लाल मातीवर रंगणार खो-खोचा थरार, राज्यातील दिग्गज खेळाडूंचा सहभाग: 65 वी पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद स्पर्धा उद्यापासून; विद्युत रोषणाईतही सामने



वेगवान चढाया, चपळ बचाव, प्रतिस्पर्ध्यांना चकविण्याची कसरत आणि विजयासाठी जीवाची बाजी… खो-खोच्या या थरारक खेळाचा अनुभव घेण्यासाठी अहिल्यानगरचे मैदान सज्ज झाले आहे. न्यू आर्ट कॉलेजच्या मैदानावरील माजी आमदार स्व. अरुणकाका जगताप क्रीडानगरीत ६५ व्या पुरु

.

स्पर्धेसाठी राष्ट्रीय दर्जानुसार लाल मातीचे मैदान तयार करण्यात आले असून प्रेक्षकांसाठी भव्य गॅलरी उभारण्यात आली आहे. विशेष म्हणजे एकाच वेळी चार मैदानांवर सामने खेळविले जाणार आहेत. सकाळी ७ ते १० आणि रात्री ७ ते १० या वेळेत विद्युत रोषणाईत सामने रंगणार असून चारही मैदानांवरील सामन्यांचे थेट प्रक्षेपणही उपलब्ध असेल.

आमदार जगताप म्हणाले, महाराष्ट्राला मैदानी खेळांची मोठी परंपरा आहे. खेळामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक व बौद्धिक विकास होतो. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर क्रीडा क्षेत्रातही करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. राज्यातील नामवंत खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.खो-खो संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. विश्वासराव आठरे यांनीही स्थानिक खेळाडूंना या स्पर्धेतून प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. नगरसेवक निखिल वारे यांनी स्पर्धेच्या तयारीची माहिती दिली.यावेळी सीए अशोक पितळे, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, खो-खो संघटनेचे सचिव विकास परदेशी, खजिनदार गौरव पितळे यांच्यासह पदाधिकारी, मान्यवर व खेळाडू उपस्थित होते. आमदार संग्राम जगताप यांनी जिल्ह्याच्या पुरुष व महिला संघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अहिल्यानगरचे संघ सज्ज! {पुरुष संघ : गौरव सोमवंशी, सोहम पवार, रुद्राक्ष नेटके, गौरव कुदळे, अभिनव गवळी यांच्यासह १५ खेळाडू. { महिला संघ : मोना घनवट, स्वामिनी साखरे, स्वरा नाईकवाडी, वैष्णवी मारकड, रुणाली प्रजापती यांच्यासह १५ खेळाडू. { पुरुष प्रशिक्षक : अभिषेक पवार { महिला प्रशिक्षक : सचिन शिरसाट



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *