Headlines

विद्यापीठात कर्मचाऱ्यांचे आंदोलन; दिवसभराचे कामकाज ठप्प: कुलगुरू डॉ. बारहाते यांची आंदोलनस्थळी भेट, मागण्यांबाबत पाठपुराव्याचे आश्वासन



अकृषी विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आज, संविधानदिनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘काम बंद’ आंदोलन केले. त्यामुळे गुरुवारी सर्व विभागांतील दिवसभराचे कामकाज ठप्प पडले. दरम्यान कुलगुरू डॉ. मिल

.

संविधान दिन असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचेही सामूहिक वाचन केले. त्यानंतर आपल्या कामबंद आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलनादरम्यान संघटनेचे महासचिव नरेंद्र घाटोळ, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, अधीक्षक मंगेश वरखेडे, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर, डॉ. मनिषा कोडापे, मोनाली तोटे, कोषाध्यक्ष विजय चवरे, संजय ढाकुलकर, ज्योती गेडाम, प्रेम मंडपे, डॉ. श्रीकांत तायडे, डॉ. धनंजय पाटील, मिलींद देशपांडे आदींनी भूमिका मांडली.

या मान्यवरांच्याही भेटी : कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, वित्त व लेखा अधिकारी सीए. पुष्कर देशपांडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. मनिषा कोडापे, अधीसभा सदस्य प्रा. कैलास चव्हाण व डॉ. जयंत वडतकर यांनीही आंदोलनस्थळाला भेट देत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सहानुभूती व्यक्त केली.

अशी आंदोलनाची श्रृंखला आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात ५ नोव्हेंबर रोजी पुणे येथील उच्च शिक्षण संचालनालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनीसकारात्मक कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र तसे न झाल्याने १८ नोव्हेंबर रोजी राज्यभर लेखणी बंद आंदोलन करण्यात आले. शासनाने याउपरही दखल घेतली नाही म्हणून आज सांकेतिक बंद पाळण्यात आला. निकट भविष्यात बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा निर्धार कर्मचा-यांनी व्यक्त केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *