Headlines

‘हॉकर्स झोन’चा तिढा आता शासनच सोडवणार: शहरात 27 झोन प्रस्तावित, अतिक्रमण, वाहतुकीच्या कोंडीची समस्या सुटण्याची आशा



हॉकर्स झोनचा मुद्दा शहरात गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित असून यावर उपाय शोधण्याचे मनपाचे सर्वच प्रयत्न आजवर फोल ठरले आहेत. अशातच उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार राज्य शासनाने हॉकर्स झोनचे नियोजन करण्याची योजना तयार करण्यासाठी फेरीवाला समितीकडून अभि

.

राज्यात फेरीवाल्यांसाठी प्रभावी योजना अस्तित्वात नसल्याचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवल्यानंतर, राज्य सरकारने २० एप्रिल २०२६ रोजी योजना तयार करण्यासाठी नव्याने समिती स्थापन केली. सोबतच, तक्रार निवारण समित्या स्थापन करण्याबाबत २८ एप्रिल २०२६ रोजी शासन निर्णय (जीआर) जारी करण्यात आला.

त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने सप्टेंबर २०२६ मध्ये राज्य सरकारला ही राज्यस्तरीय फेरीवाला योजना चार महिन्यांच्या आत अधिसूचित करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असून याच्या पूर्ततेसाठी १ डिसेंबर २०२६ रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे. उपमहापौर सचिन भेंडे, बाजार परवाना अधीक्षक उदय चव्हाण यांनी आम्ही शासनाकडून येणाऱ्या योजनेची वाट बघत आहोत. अस्वच्छता, वाहतुकीची कोंडी व अतिक्रमणाची समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार असल्याचे मत व्यक्त केले आहे.

शासन योजनेनुसार हॉकर्स झोनचे स्वरूप असे राहणार रुंदीने लहान असलेले रस्ते व पदपथ, मुख्य चौक, धार्मिक स्थळे, रुग्णालये, शाळा-महाविद्यालये आणि रेल्वे स्थानकाच्या १०० मीटर परिसरात व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. हॉकर्स झोनचे स्वरूप, जागा निश्चिती, नेमके कुठे हॉकर्स झोन असावेत अशा बाबींचा समावेश आहे.

शासनाच्या योजनेनुसार हॉकर्सला झोन मिळणार ^उच्च न्यायालयाने शासनाला जे दिशा निर्देश दिले आहेत त्यानुसार शासन जी योजना तयार करेल त्यातील सुचनांनुसार शहरातील हॉकर्सला झोन दिले जाणार आहेत. त्यासाठी एक ते दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. – सचिन भेंडे, उपमहापौर

महानगर पालिका गंभीर नाही ^महानगर पालिका हॉकर्सबाबत गंभीर नाही. नियमानुसार दर तीन महिन्यांनी हॉकर्स समितीची बैठक होणे अनिवार्य असताना ती घेतली जात नाही. राज्य शासनाने निर्देश दिल्यामुळे वर्षातून एकदाच बैठक झाली. मनपाने पुढाकार घेतल्यास मार्ग मोकळा होईल. – गणेश मारोटकर, फेरीवाला समिती सदस्य, अमरावती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *