डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात तरतूद केली होती की 2026 पर्यंत लोकसभेच्या जागा 550 राहतील आणि त्यानंतर जागा वाढवण्याबाबत कायदा करण्यात येईल. त्याच संवैधानिक तरतुदीनुसार डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाचे विधेयक येत आहे. मात्र, संजय राऊत यांना संविध
.
नवनाथ बन म्हणाले की, लोकसभेत किती खासदार असावेत हे कोणी सामान्य व्यक्ती ठरवत नसून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेल्या सूत्रानुसार आणि लोकसंख्येच्या प्रमाणानुसार ते ठरवले जात आहे. खासदारांची संख्या वाढवण्याचा अधिकार संविधानानेच दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विनाकारण विरोध सुरू
नवनाथ बन म्हणाले की, महिला आरक्षण विधेयकावरून राऊत यांचा ‘गजनी’ झाला आहे. 2023 मध्ये जेव्हा नारीशक्ती वंदन विधेयक मंजूर झाले होते, तेव्हाच त्यात महिलांना 33 टक्के आरक्षण आणि लोकसभेच्या जागा वाढवणे याचा समावेश होता. त्या वेळी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने आणि काँग्रेसने या विधेयकाला पाठिंबा दिला होता. आता त्याचा विसर पडल्याने ते विनाकारण विरोध करत असून, यातून त्यांची महिलाविरोधी भूमिका पुन्हा एकदा समोर आली आहे, अशी टीका बन यांनी केली.
पराभवाची कारणे शोधणं सुरू
नवनाथ बन म्हणाले की, भाजपचा विजय होणार की पराभव, हे देशातील जनता ठरवते. यापूर्वी जनतेने पराभव केल्यानंतर विरोधकांनी आधी ईव्हीएमचे कारण दिले, नंतर मतचोरीचा आरोप करत निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आता 2029 चा पराभव समोर दिसत असल्याने संजय राऊत डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून पराभवाची कारणे शोधत आहेत, असा दावा नवनाथ बन यांनी केला आहे.
हे ही वृत्त वाचा
डिलिमिटेशन विधेयक राष्ट्रविरोधी:लोकसभेचे महत्त्व कमी करण्याचा डाव; विधेयकाला पाठिंबा देणारे इतिहासात ‘गद्दार’ ठरतील- संजय राऊत

डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना देशाची जनता इतिहासात ‘गद्दार’ म्हणून लक्षात ठेवेल, असे विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे. देशाचे विभाजन होत असताना, लोकसभेचे महत्त्व कमी केले जात असताना आणि जनतेकडून सत्ता हिरावून घेतली जात असताना जे खासदार सरकारच्या बाजूने मतदान करतील, त्यांना जनता गद्दारच मानेल, असे ते म्हणाले. हे विधेयक राष्ट्रविरोधी असून यामुळे लोकसभेचे महत्त्व कमी होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. वाचा सविस्तर