Headlines

मार्कंडेश्वर, कार्तिकेय स्वामी मंदिरात शिवपरिवाराचे दर्शन:वर्षातून एकदा उघडणाऱ्या कार्तिकेय स्वामी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी




देवरण (जमादार वाडी) येथील प्रसिद्ध श्री मार्कंडेश्वर व भगवान कार्तिकेय स्वामी मंदिर संपूर्ण भारतात विशेष श्रद्धास्थान मानले जाते. शके १८६२ मध्ये स्थापन झालेल्या या मंदिरास प. पू. गजानन महाराज (अक्कलकोट निवासी), प. पू. नागानिर्वाण महाराज (कानपूर निवासी), प. पू. मौनीबाबा (मंडला, म. प्र.) व प. पू. रामकृष्ण महाराज (चिखली) यांसारख्या थोर संत-महंतांच्या वास्तव्याने पावन सान्निध्य लाभले आहे. जुनी वस्ती देवरण मार्गावरील माजी नगराध्यक्ष दादासाहेब जमादार यांच्या जमादार वाडीतील शेतात निर्मित भुयारात हे प्राचीन मार्कंडेश्वर मंदिर वसलेले आहे. संपूर्ण भारतभरात या मंदिराचे अद्वितीय महत्त्व आहे. भाविकांना एकाच ठिकाणी संपूर्ण शिवपरिवाराच्या दर्शनाचा दुर्मिळ लाभ मिळतो. मंदिराच्या तळघरात भगवान कार्तिकेय स्वामींची अत्यंत मनमोहक व तेजस्वी षड्मुखी संगमरवरी मूर्ती स्थापित आहे. गर्भगृहात १२ वर्षीय बाल मार्कंडेय मुनींना आलिंगन देणाऱ्या भगवान शिवांची (पिंडी) स्थापना आहे. पिंडीसमोर काळ्या पाषाणातील भगवान यमराजांची दुर्मिळ मूर्ती विराजमान आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात नैसर्गिक प्रवाहाने पाणी साचते. हे येथील विशेष वैशिष्ट्य आहे. इतर विग्रह व अष्टदिशांची सुरक्षा मंदिरात श्री गणेशजी, आई पार्वती, श्री स्वामी समर्थ महाराज, श्री नागानिर्वाण महाराज, श्री गंगाधर महाराज (अक्कलकोट), श्री हरिप्रसाद ब्रह्मचारी महाराज (वरूड / बडनेरा) यांच्या विलोभनीय मूर्ती आहेत. तसेच, गर्भगृहाच्या बाहेर ईशान्येला भगवान सूर्यनारायण, आग्नेयेला पंचमुखी गायत्री माता, नैऋत्येला पूर्वमुखी हनुमान व वायव्येला भगवान कालभैरव यांच्या संगमरवरी मूर्तींची स्थापना करून अष्टदिशांची सुरक्षा साधली आहे. हे मंदिर वर्षातून केवळ एकदाच, म्हणजेच दरवर्षी कार्तिकी पौर्णिमेला, भाविकांच्या दर्शनासाठी उघडण्यात येते. कार्तिकी पौर्णिमा व कृत्तिका नक्षत्राच्या मुहूर्तावर दर्शनासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह मध्य प्रदेश व आंध्र प्रदेशातून हजारो भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने हजेरी लावतात. मंदिराची ठळक वैशिष्ट्ये स्थापना : शके १८६२ (थोर संत-महंतांच्या सान्निध्यात) मुख्य वैशिष्ट्य : भुयारातील मंदिरात एकाच ठिकाणी संपूर्ण शिवपरिवार आणि भगवान यमराजांच्या दुर्मिळ मूर्तीचे दर्शन. षडमुखी मूर्ती : तळभागात भगवान कार्तिकेय स्वामींची सुंदर संगमरवरी षडमुखी मूर्ती. दर्शनाचा काळ : वर्षातून केवळ एकदा (कार्तिकी पौर्णिमा व कृतिका नक्षत्र). निसर्गाचा चमत्कार : मंदिराच्या गाभाऱ्यात नैसर्गिक प्रवाहाने साचणारे पाणी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *