![]()
जिल्ह्यात यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीसोबतच पशुपालन व्यवसायासमोरही मोठे संकट उभे राहिले आहे. पावसाअभावी चाऱ्याची उपलब्धता कमी होत आहे. जनावरांचे संगोपन कसे करावे, असा प्रश्न पशुपालकांसमोर उभा ठाकला आहे. अशा परिस्थितीत म्हैसपूर येथील आदर्श गोसेवा
.
विवाहसोहळ्यात पाहुण्यांकडून भेट म्हणून मिळणारी रक्कम (आहेर) चारा आणि गोसेवेसाठी अर्पण करण्याचा संकल्प चांडक कुटुंबाने केला आहे. विशेष म्हणजे, या निर्णयाचा संदेश लग्नपत्रिकेतूनच पाहुण्यांपर्यंत पोहोचवण्यात आला आहे. आनंदाच्या क्षणी समाजातील गरजू घटकांची आणि मुक्या प्राण्यांची आठवण ठेवणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार आहे.
वधू-वरांना शुभेच्छांसह भेटवस्तू किंवा रोख रक्कम देण्याची परंपरा आहे. मात्र, रवी चांडक यांच्या कुटुंबाने या परंपरेला विधायक वळण देण्याचा निर्णय घेतला आहे. लिफाफ्यातून शुभेच्छा दिल्यास ती रक्कम गोवंशाच्या चाऱ्यासाठी व गोसेवेसाठी समर्पित करण्यात येणार आहे.
यंदा चाऱ्याचे आव्हान दुष्काळामुळे पशुधनासाठी आवश्यक असणाऱ्या हिरव्या व सुक्या चाऱ्याची तीव्र टंचाई भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून चाऱ्याची जिल्ह्याबाहेर वाहतूक व विक्री करण्यास बंदी घालण्याचा आदेश प्रशासनाकडून जारी झाला आहे. जिल्ह्यात सध्या सुमारे ३ लाख ७१ हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. जिल्ह्यात पशुधन ३ लाख ८४ हजार ८३ आहे. दुष्काळामुळे पशुपालकांसमोर चाऱ्याचे संकट आहे. गो-रक्षण संस्थांनाही चाऱ्यासाठी धावपळ करावी लागत आहे.
१८०० गोवंशांचे संगोपन आदर्श गोसेवा एवम् अनुसंधान प्रकल्प या संस्थेतर्फे १९९९ पासून गो-रक्षणाचे कार्य अविरतपणे सुरू आहे. प्रकल्पाच्या म्हैसपूर, आळेगाव, सावरगाव येथे गोशाळा आहेत. यात सुमारे १८०० गोवंशांचे संगोपन होते. तसेच जप्त गोवंशांचीही देखभाल होते. एका गोवंशाला ८ ते १० किलो चारा लागतो. वर्षभर ८०० ते १ हजार टन कोरडा चारा लागतो.