Headlines

मुलांच्या हातामध्ये बुलेटची चावी; अकोटात पालकांचा जीवघेणा लाड:कर्णकर्कश हॉर्न वाजवण्यासह फॅन्सी नंबर प्लेटचा सुळसुळाट




अकोट शहरातील मुख्य रस्ते, चौक, वर्दळीच्या ठिकाणी अल्पवयीन मुलांकडून बिनधास्त दुचाकी चालवण्याचे प्रकार वाढले आहेत. अनेक अल्पवयीनांच्या हातात बुलेटसारख्या वजनदार (अवजड) दुचाकींच्या चाव्या दिसतात. ही मुले भरधाव वेगाने वाहने चालवतात. यामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालकांच्या जबाबदारीवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. वाहन चालवण्याचा परवाना नसतानाही अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकीच्या चाव्या सहज दिल्या जात आहेत. वाहतुकीचे नियम आणि वेगावर नियंत्रण ठेवण्याची समज कमी आहे. तरीही ही मुले रस्त्यावर बेधडक वाहने पळवतात. अचानक कट मारतात. स्टंटबाजी करतात. काही दुचाकींवर फॅन्सी नंबर प्लेट असते. कर्णकर्कश हॉर्न वाजतात. याचा सर्वाधिक त्रास सामान्य नागरिकांना होतो. या प्रकारांमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यावरून जाताना जीव मुठीत धरावा लागतो. शहरातील वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. विनापरवाना वाहन चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांसह पालकांवरही कडक कारवाई होणे गरजेचे आहे. संबंधित वाहनमालक आणि पालकांवरही कायदेशीर कारवाईची मागणी होत आहे. शाळा-महाविद्यालय परिसर, प्रमुख चौकांमध्ये नियमित तपासणी केल्यास प्रकार थांबू शकतात. मोठी दुर्घटना घडल्यानंतर पश्चात्ताप नको, असा सूर आहे. पालकांनी, प्रशासनाने वेळीच सावध व्हावे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. अपघात टाळण्यासाठी हे आवश्यक पालकांची जबाबदारी: मुलांच्या हट्टापोटी वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय आणि परवाना नसताना वाहन देऊ नये. अल्पवयीन वाहनचालक आढळल्यास संबंधित वाहनमालक आणि पालकांवर दंडात्मक कारवाई करावी. महाविद्यालये- शाळा परिसरात व शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवावी. अल्पवयीनांवर कडक कारवाई करावी ^शहरात अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चालवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. शहरात विनापरवाना दुचाकी चालवणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी या प्रकारांकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी. तसेच पालकांनी देखील आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये. – कमल वर्मा, शहर संघटक, शिवसेना (उबाठा). असे आहेत रस्त्यांवरील बेशिस्तीचे प्रमुख प्रकार परवाना नसतानाही अल्पवयीन मुलांकडून बुलेटसारख्या जड वाहनांचा भरधाव वापर केला जात आहे. मित्रांमध्ये छाप पाडण्यासाठी वर्दळीच्या रस्त्यांवर धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे. दुचाकींना कर्णकर्कश सायलेन्सर बसवणे, मोठ्या आवाजाचे हॉर्न व फॅन्सी नंबर प्लेट लावण्याचा सुळसुळाट देखील मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *