Headlines

Anjali Ambedkar Questions Sharad Pawar, Supriya Sule BJP B-Team Stance


शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे भाजपच्या विभाजनवादी राजकीय अजेंड्याला पुढे नेतात. मात्र, त्यांना भाजपची बी-टीम म्हटले जात नाही, असा सामाजिक कार्यकर्त्या अंजली आंबेडकर यांनी केला आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे जेव्हा उघडपणे भाजपला राजकीय मदत करतात, तेव

.

अंजली आंबेडकर म्हणाल्या की, भाजपने प्रस्तावित केलेले डिलिमिटेशन विधेयक हे ‘SIR’ पेक्षाही अधिक धोकादायक आहे. या डिलिमिटेशन विधेयकामुळे उत्तर भारतातील राज्यांचे संसदेतील प्रतिनिधित्व असमान प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. यामुळे भारताच्या संघराज्यीय समतोलाला मूलभूत धक्का बसू शकतो. एका विशिष्ट प्रादेशिक गटाच्या हातात राजकीय सत्ता केंद्रित होऊ शकते आणि संघराज्य व्यवस्थेतील समान प्रतिनिधित्वाच्या लोकशाही तत्त्वाला बाधा पोहोचू शकते. हा काही केवळ संसदेतील तांत्रिक प्रक्रियेचा विषय नाही; हा भारताच्या लोकशाहीच्या भविष्याशी संबंधित प्रश्न आहे.

आम्ही प्रस्थापितांच्या पंखाखाली जात नाही म्हणून बी टीम ठरवता

अंजली आंबेडकर म्हणाल्या की, आम्ही प्रस्थापित पक्षाच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले नाही तर आम्हाला बी-टीम ठरवले जाते. वंचित स्वतःचे राजकारण उभे करू पाहते. आम्ही जेव्हा प्रस्थापितांच्या पंखाखाली जात नाही, तेव्हा तुम्ही आम्हाला बी-टीम ठरवता. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या अलीकडील निर्णयावर टीका करणारे खुले पत्र किती स्त्रीवादी कार्यकर्त्यांनी लिहिले, असा सवालही त्यांनी केला आहे.

त्यावेळी आवाज का बंद होतात?

अंजली आंबेडकर म्हणाल्या की, वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे निवडणूक लढवते म्हणून तिला भाजपची बी-टीम ठरवण्यासाठी उच्चवर्णीय स्त्रीवादी, पुरोगामी आणि ‘निर्भय बनो’चे लोक नेहमीच तत्पर असतात. मात्र, शरद पवार आणि सुप्रिया सुळे जेव्हा उघडपणे भाजपला राजकीय मदत करतात, तेव्हा अचानक त्यांचे आवाज बंद होतात. 2024 च्या निवडणुकीत काही राजकीय पक्षांसाठी या उच्चवर्णीय स्त्रीवादी, पुरोगामी आणि ‘निर्भय बनो’च्या लोकांनी जोरदार प्रचार केला; त्या पक्षांना प्रश्न विचारण्याची वेळ येते तेव्हा मात्र ते जाणीवपूर्वक गप्प बसतात. हा बौद्धिक विसंगतीचा प्रश्न नाही, तर राजकीय सोय आणि जातीवर आधारित निवडक संताप दाखवणारी कृती आहे. यांच्या राजकीय नैतिकतेत एक विचित्र दुटप्पीपणा दिसून येतो. बहुजनांच्या राजकीय अस्मितेवर आणि वंचित बहुजन आघाडीच्या स्वतंत्र राजकीय अस्तित्वावर ते सतत प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. मात्र, ज्या सवर्ण राजकीय पक्षांच्या कृती भाजपचा सामाजिक आणि राजकीय अजेंडा अधिक मजबूत करत आहेत, त्यांच्याबाबत मात्र कमालीची उदार भूमिका घेतात.

तुमचा संताप राजकीय सोय अन् जातीवर आधारित

अंजली आंबेडकर म्हणाल्या की, शरद पवार आणि सुप्रिया सुळे भाजपच्या विभाजनवादी राजकीय अजेंड्याला पुढे नेणाऱ्या आणि भारताच्या लोकशाही व संघराज्यीय पायाभूत रचनेला कमकुवत करणाऱ्या राजकीय प्रक्रियेला मदत करत आहेत, ही काही लपून राहिलेली गोष्ट नाही. मात्र, प्रश्न असा आहे की, उच्चवर्णीय स्त्रीवादी, पुरोगामी आणि निर्भय बनोच्या लोकांनी मौन का बाळगले आहे? वंचित बहुजन आघाडी केवळ स्वतंत्रपणे निवडणूक लढवते म्हणून ती आपोआप भाजपची बी-टीम ठरते; मग शरद पवार आणि सुप्रिया सुळे भाजपच्या राजकीय अजेंड्याला मदत करतात आणि त्याला वैधता मिळवून देतात, तेव्हा त्यांना भाजपची बी-टीम का म्हटले जात नाही? तुमचे हे मौन, तुमचा संताप हा केवळ राजकीय सोय आणि जातीवर आधारित आहे. यातून तुमचा बौद्धिक अप्रामाणिकपणा आणि बहुजन राजकीय पक्षांविषयी असलेला द्वेष उघड होतो. तुम्ही सर्वजण विकले गेलेले आहात असे भाजपला पोटतिडकीने विरोध करणाऱ्या फुले-आंबेडकरी कार्यकर्त्यांनी गृहीत धरावे का? असा सवाल अंजली आंबेडकर यांनी केला आहे.

हे ही वृत्त वाचा

पवारांचा पक्ष भाजपची बी टीम नाही, डिलिमिटेशनवर कोणताही सौदा नाही:संस्कृतीप्रमाणे असणाऱ्या खाद्यावर बंदी योग्य नाही; मीरा-भाईंदर वादावर संजय शिरसाटांची भूमिका

कोणताच पक्ष कोणाची बी टीम नसतो, प्रत्येकाचे आपले वेगळे अस्तित्व आहे आणि त्या पद्धतीने ते काम करत असतात. एखाद्या पक्षाला विरोध किंवा पाठिंबा दिला म्हणून त्यावर तातडीने बोलणं योग्य नाही, असे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. अंजली आंबेडकर यांनी शरद पवार यांच्या पक्षावर केलेल्या भाजपची बी टीम या टीकेवर ते बोलत होते. सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या केवळ बातम्या आहेत; त्यांनी स्वतः सांगितले आहे की आम्ही डिलिमिटेशन बिलला पाठिंबा देणार आहोत, याबदल्यात दुसरा असा काही सौदा झालेला नाही. शरद पवार राजकीय निवृत्ती घेतील असे वाटत नाही; त्यांची तब्येत बरी नसली तरी ते दुष्काळी भागाचे दौरे करत आहेत, असेही शिरसाट यांनी नमूद केले. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.