Headlines

Navnath Ban Challenges Sanjay Raut Over Alibaug Bungalow Controversy


संजय राऊत यांना जर अलिबागमध्ये पत्रकार परिषद घ्यायची असेल, तर त्यांनी उद्धव ठाकरे यांचे तिथे जे 19 बंगले आहेत, त्या ठिकाणी जाऊन पत्रकार परिषद घ्यावी, असे आव्हान भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिले आहे. ते 19 बंगले नेमके कसे बांधले गेले, कसे तोडले गेले

.

नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांनीही शेतकऱ्यांना धमकावून 8 ते 10 सातबारे बळजबरीने स्वतःच्या कुटुंबियांच्या नावावर करून घेतले आहेत. हिंमत असेल तर त्या शेतकऱ्यांसोबत आणि अलिबागच्या 19 बंगल्यांसमोर पत्रकार परिषद घेऊन दाखवावी. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कोणाचीही फसवणूक केली नसून, त्यांनी विधानसभेत खरी शिवसेना कोणाची याबद्दल निकाल दिल्यामुळे राऊतांच्या मनात त्यांच्याविषयी राग आहे. याच रागातून नार्वेकर यांना बदनाम करण्यासाठी खोटे आरोप केले जात आहेत.

नार्वेकरांनी कोणाची फसवणूक केली नाही

नवनाथ बन म्हणाले की, राहुल नार्वेकर यांनी आमची कोणतीही फसवणूक केली नाही, हे संबंधित आदिवासी बांधवांनी स्वतः व्हिडिओद्वारे स्पष्ट केले आहे. तरीही राऊतांकडून खोटे आरोप सुरूच आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणत्याही भ्रष्टाचाऱ्याला पाठीशी घालणार नाही, असे राऊतांनी संजय शिरसाट यांच्यावर केलेल्या आरोपावर बोलाताना बन यांनी म्हटले आहे. तर महाविकास आघाडीच्या काळात भ्रष्टाचार जोरात सुरू होता आणि त्याप्रकरणी राऊतांना तुरुंगातही जावे लागले होते.

उद्धव ठाकरे हे भ्रष्टाचाराचे शिरोमणी

नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरे हे भ्रष्टाचाराचे शिरोमणी होते. 100 कोटींच्या वसुली प्रकरणातून महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करण्याचे काम मविआ सरकारने केले आणि आज संजय राऊत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. देवाभाऊंच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार अजिबात सहन केला जात नाही. राऊतांनी पत्राचाळ घोटाळ्यात हजारो कोटी रुपये लुटून मराठी माणसाला बेघर केले, त्याचा आधी हिशोब द्यावा. कोणावरही आरोप करण्यापूर्वी राऊतांनी त्याचे पुरावे सादर करावेत; कारण हवेत गोळीबार करणे हा त्यांचा जुनाच धंदा आहे.

हे ही वृत्त वाचा शिरसाटांनी 5 कोटींची लाच मागितली:संजय राऊत यांचा आरोप, म्हणाले- त्यांची 27 प्रकरणे माझ्याकडे, शिंदेंना तोंड दाखवणं अवघड होईल!

लातूरमधील संस्थेच्या 25 कोटींच्या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी समाज कल्याणमधील कामासाठी त्या खात्याच्या मंत्र्यांनी आपल्या 72 व्या मजल्यावरील खासगी घरी बोलावून स्वतः पाच कोटी रुपयांची लाच मागितल्याचा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत राऊत यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. रक्कम न दिल्याने प्रस्ताव रखडल्याचा दावा राऊत यांनी केला असून आता या आरोपावर सामाजिक न्यायमंत्री काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.