Headlines

भरधाव कार ट्रकवर आदळली; चालकाचा मृत्यू:लोणी काळभोरमध्ये अपघात; महिलेसह तिघे जखमी, ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल




पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर परिसरात भरधाव कार रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकवर आदळली. या अपघातात कार चालकाचा मृत्यू झाला, तर महिलेसह तिघे जखमी झाले. ट्रक चालकाविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिवाजी सखाराम होजगे (रा. सावंतवाडी, महागाव, ता. वडगाव मावळ, जि. पुणे) असे मृत कार चालकाचे नाव आहे. अपघातात त्यांची पत्नी सुनंदा, मुलगा रोहित आणि राहुल जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. थांबलेल्या ट्रकला कारची धडक रोहित शिवाजी होजगे (वय 28) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, शिवाजी होजगे, पत्नी सुनंदा, मुलगा रोहित आणि राहुल मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास कारीने पुणे-सोलापूर रस्त्याने जात होते. ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल राजेंद्र पेट्रोल पंपाजवळ ट्रक चालकाने रस्त्याच्या कडेला ट्रक थांबवला होता. ट्रकचे दिवे लावलेले नव्हते. अंधारात भरधाव कार मागून ट्रकवर आदळली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी चौघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू होण्यापूर्वीच शिवाजी होजगे यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. अपघातास जबाबदार ठरणे आणि वाहतुकीचे नियम न पाळल्याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक बोराटे तपास करत आहेत. दोन दिवसांपूर्वी वाघोलीत अपघात दोन दिवसांपूर्वीच( 23 नोव्हेंबर) रोजी मध्यरात्री अहिल्यानगर रस्त्यावरील वाघोली परिसरात भरधाव कार ट्रकवर आदळून कार चालक तरुणासह तिघांचा मृत्यू झाला होता. या अपघातात कारीतील दोघे जण गंभीर जखमी झाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *