Headlines

एका घटनेमुळे संपूर्ण पोलिस दलावर टीका करणे योग्य नाही: मंदार किवळे हल्ल्याप्रकरणी पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची स्पष्टोक्ती



पुण्यातील शिवाजीनगर न्यायालय परिसरात बुधवारी (ता. 26) दुपारी एकच्या सुमारास सहा जणांच्या टोळक्याने भरदिवसा एका तरुणावर गोळीबार आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. कात्रजमधील शुभम चव्हाण खून प्रकरणात आठवडाभरापूर्वीच जामिनावर सुटलेला आरोपी मंदार किवळे (व

.

या घटनेनंतर शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत नागरिकांमधून पोलिसांवर रोष व्यक्त केला जात होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत रात्री उशिरापर्यंत सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. तसेच, या संपूर्ण प्रकरणाबाबत आणि वाढत्या टीकेच्या अनुषंगाने पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत पोलिसांची बाजू स्पष्ट केली आहे.

अमितेश कुमार काय म्हणाले?

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झालेल्या माहितीनुसार मंदार किवळेचा तीन दिवसांपूर्वी बेल झाली आणि जमानत झाल्यानंतर तो बाहेर आला, बाहेर आल्यानंतर कोर्टाच्या कामकाजानिमित्त तो शिवाजीनगर कोर्टात आला होता, त्यावेळी ही घटना घडली. त्यांची ज्यांनी सुपारी दिली, हे सगळे दोन दिवसात घडली आहे, आरोपींच्या विचारपूस आणि चौकशीत दोन दिवसात कट रचला असे समोर आले. जेव्हा आरोपींना कळले की मंदार किवळेची कोर्टाची तारीख आहे, तो कोर्ट परिसरात जाणार आहे, आणि तो बेल वरती बाहेर आल्यानंतर कुठे आहे त्याची कल्पना आरोपींना नव्हती, पण कोर्टाची तारीख आहे त्यामुळे तो कोर्टात जाणार असल्याची माहिती आरोपींना खात्रीशीर मिळाल्याने त्या अनुषंगाने दोन दिवसापूर्वी हा कट त्यांनी रचला, आणि ही घटना घडवून आणली आहे, अशा प्रकारची माहिती आत्तापर्यंतच्या तपासात दिसून आलेली आहे.

तसेच ज्यांनी सुपारी दिली होती, त्यांनी काही पैसे ठरवले होते, त्यापैकी काही पैसे दिले होते, त्याच पैशातून आरोपींनी काही हत्यारे घेतले होते, अशी माहिती समोर आली आहे. सर्व आरोपी ताब्यात आल्यानंतर संपूर्ण, सखोल तपास होईल, त्यांना कोठडी देण्यात आली आहे, यामध्ये तपासात आणखी काही गोष्टी स्पष्ट होतील, असे अमितेश कुमार यांनी सांगितले.

घटना घडल्यानंतर पोलिसांचा रिस्पॉन्स पाहणेही महत्त्वाचे

एका वृत्तवाहिनील बोलताना अमितेश कुमार म्हणाले की, कालची घटना अत्यंत गंभीर अशी आहे, कोर्टाच्या समोर रस्त्यावर ही घटना घडली आहे, परंतु एका घटनेने पूर्ण शहराच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणे किती योग्य आहे ते लोकांनी स्वतः विचार करायला पाहिजे. अशी फायरिंगची घटना बहुतेक सहा महिन्यानंतर ही घटना घडलेली आहे, मागच्या सहा महिन्यांचा रेकॉर्ड आपण पाहिला तर कोणत्याही प्रकारचा गंभीर गुन्हा घडलेला नाही. कोयत्याचे प्रकरण असतील किंवा फायरिंगचे प्रकरण असतील याची पूर्णपणे परिस्थिती सुधारलेली होती, थांबलेली होती, काल ही एक घटना घडलेली आहे. ही गंभीर घटना होती परंतु ही घटना घडल्यानंतर पोलिसांच्या रिस्पॉन्स पण कसा होता याचीही लोकांना त्याची जाणीव व्हायला पाहिजे.

ही घटना घडल्याबरोबरच तिथे असलेले पोलिस यांनी जखमीला तात्काळ ससून रुग्णालयात दाखल केले, अर्ध्या तासाच्या आतमध्येच त्यांची ट्रीटमेंट सुरू झाली, त्या ट्रीटमेंटमुळे आज आम्हाला ट्रीटमेंट करणाऱ्या डॉक्टर कडून मिळालेले प्रतिसाद आहे त्यावरून वाटते की जखमीचा जीव वाचतो आहे, तात्काळ जखमीवर उपचार आणि त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न आणि त्याच बरोबर आमचे वेगवेगळे पथक आरोपीच्या शोध मोहिमेत लावण्यात आले होते, एक ते दीड तासाच्या आतमध्ये तीन आरोपी पुण्याच्या वेगवेगळ्या भागातून ताब्यात घेण्यात आले आणि त्याचबरोबर दौंडच्या दिशेने पळून जात असताना आमच्या टीमने साडेचार वाजताच्या सुमारास अंदाजे तीन ते साडेतीन तासांमध्ये घटनेतील जे आरोपी होते, त्यांना ताब्यात घेतले आहे अशा प्रकारचं रिस्पॉन्स पण पोलिसांनी दिलेला आहे पाहणे गरजेचे आहे.

पोलिस दलावर टीका करणे योग्य नाही

अमितेश कुमार म्हणाले, काल रात्री उशिरा, आज, आत्तापर्यंत आणखी दोन आरोपी सापडलेले आहेत, त्यांनाही ताब्यात घेण्यात आलेले आहे, काही आरोपी या घटनेमध्ये असल्याचे निष्पन्न होण्याची शक्यता आहे, त्यावरती पण पोलिस तपास करत आहेत, त्या आरोपींची चौकशी करून आणि पुराव्याच्या आधारे इतर आरोपींनाही पोलिस अटक करतील, एकूण नऊ पैकी आठ आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहेत. आता या घटनेचे गांभीर्य पाहून डीसीपी क्राईम हे स्वतः तपास करतील या दृष्टिकोनातून आदेश देण्यात आले आहेत आणि ते स्वतः तपास करतील याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. या घटनेमध्ये जे कोणी सामील असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची पावले कालपासूनच उचललेली आहेत. पुढचाही काम आणखी जोरात करण्यात येईल. बद्दल एकंदरीत शहराची कायदा व सुव्यवस्था याबद्दल मी आपल्याला सांगू इच्छितो की, पूर्ण आलेखाच्या आधारावर जे स्ट्रीट क्राईम्स आहेत, किंवा इतर कोणतेही प्रकार असतील, कोयते किंवा इतर शस्त्र वापरण्याचे प्रकार असतील किंवा मर्डरचे प्रकार असतील ते कमी झालेले आहेत, ही गंभीर घटना नक्कीच मोठी आहे, परंतु एक अशी घटना घडल्यामुळे पूर्ण शहराला आणि शहरातील पोलिस दलावर टीका करणे योग्य नाही असं आमचं मत आहे, असे अमितेश कुमार यांनी म्हटले.

नागरिकांनी पोलिसांवर विश्वास ठेवावा

अमितेश कुमार म्हणाले, याआधीच न्यायालय परिसराचे ‘सिक्युरिटी ऑडिट’ पूर्ण करण्यात आले असून, या भागाला शिस्त लावण्यासाठी ठोस पावले उचलण्यास सुरुवात झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, या घटनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणावर नाकाबंदी, ‘कोम्बिंग ऑपरेशन’ (राऊंड अप) आणि गुन्हेगारांविरुद्धची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. पोलिस दल गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी कठोर परिश्रम घेत असून, नागरिकांनी पोलिसांवर विश्वास ठेवावा, असे आवाहनही अमितेश कुमार यांनी केले आहे.

पुन्हा एकदा फॉलोअप बैठक होणार

परिसराला आणखी कशाप्रकारे सुरक्षित करता येईल, याची तपासणी झाली, एन्ट्री गेट आणि आत मध्ये सोडताना काय करता येईल, पार्किंगचे व्यवस्था कुठे ठेवता येईल, सुरक्षा आणखी परिणामकारक कशी करता येईल, कडक सुरक्षा कशी करता येईल, सीसीटीव्ही पूर्ण परिसरात कशी लावता येईल, आजूबाजूचे रस्ते आणि परिसरातील अतिक्रमण कशाप्रकारे काढता येईल, बाहेरच्या लोकांना एंट्री नाही त्यांना कसा थांबवता येईल, त्यांच्या पार्किंगचे व्यवस्था कशी करता येईल, या सर्व विषयांवर चर्चा झालेली आहे, त्या अनुषंगाने आज परत एकदा फॉलोअप बैठक इतर पोलिस अधिकारी आणि पीडब्ल्यूडी ऑफिसर आणि बारचे मेंबर यांची संयुक्तपणे पाहणी झाली आहे, याची डिटेल एसओपी करण्यात येणार आहे, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *