Headlines

कृषी विक्रेत्यांचा बेमुदत बंद सुरू:लासूर स्टेशनला १००% प्रतिसाद




प्रतिनिधी | लासूर स्टेशन लासूर स्टेशनसह गंगापूर तालुक्यातील कृषी साहित्य विक्रेत्यांच्या बेमुदत बंदला सोमवारी उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुकानदारांनी सकाळपासून दुकाने बंद ठेवली. जाचक अटींचा निषेध केला. २७ तारखेपासून बेमुदत बंदला पाठिंबा दिला. योग्य निर्णय होत नाही तोपर्यंत बंद सुरू ठेवण्याचा इशारा दिला. माफदा महाराष्ट्र फर्टिलायझर्स डीलर्स असोसिएशनतर्फे राज्यभर हा बंद पुकारण्यात आला आहे. देशातील असोसिएशननेही संपात सहभाग नोंदवला आहे. युरिया, डीएपी खतांना कंपन्यांकडून होत असलेल्या लिंकिंगला विरोध हा प्रमुख मुद्दा आहे. शासनाचे अडचणीचे कायदे, खतांचा पुरवठा, खतांच्या गोण्यांमागील अत्यंत कमी मार्जिन, साथी सीड पोर्टल ॲप यासह अनेक मागण्यांसाठी बंद पुकारला आहे. लिंकिंगमुळे शेतकऱ्यांना गरज नसलेली उत्पादने घ्यावी लागतात. दुकानदारांचा दोष नसतानाही शेतकऱ्यांचा रोष दुकानदारांवर निघतो, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत बंद सुरू राहणार आहे. लासूर स्टेशनमधील सर्व कृषी साहित्य विक्रेत्यांनी १०० टक्के सहभाग नोंदवला, असे ज्येष्ठ कृषी व्यापारी संजय पाटील कापसे यांनी सांगितले. जिल्हा कृषी साहित्य विक्री संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा लासूर बाजार समिती संचालक प्रकाशशेठ मुथा म्हणाले, शासनाच्या जाचक अटी, कायद्यांमुळे त्रास होतो. लिंकिंगमुळे कोणतीही कंपनी बिनालिंकिंगचा माल देत नाही. व्यवसाय करणे अवघड झाले आहे. खते पोहोच मिळत नसल्याने ती मूळ किमतीच्या वर येऊन पडतात. लासूर स्टेशन येथे कृषी सेवा विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद ठेवली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *