Headlines

संकटांची मालिका संपेना; हतबल शेतकऱ्यांची मोसंबी बागांवर कुऱ्हाड:मोसंबीवर रोगराईचा वाढला घाट, शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची बिकट वाट




दत्तात्रय मुळे | ढोरकीन सतत हवामान बदल, अवकाळी पाऊस, पडलेले बाजारभाव, आटोक्यात न येणारी प्रचंड रोगराई, उन्हाच्या तीव्र झळा व पाण्याची कमतरता यामुळे पैठण तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांवर मोसंबी बागेवर अखेर कुऱ्हाड चालवण्याची व जेसीबी यंत्राच्या साहाय्याने बागा उपटून फेकण्याची वेळ आली. अनेक शेतकऱ्यांनी कष्टाने उभ्या केलेल्या बागा प्रामुख्याने रोगराई आटोक्यात न आल्याने व पाण्याअभावी सुकू लागल्याने जेसीबीच्या साहाय्याने मोसंबीची झाडे अखेर उपटून फेकावी लागत आहेत. पैठण तालुका मोसंबीचे माहेरघर म्हणून ओळखला जातो. पाचोड येथील मोसंबी मार्केट ही तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असून मराठवाड्यातील कित्येक शेतकरी येथे आपली मोसंबी विक्रीसाठी नेतात. चवदार, गोड, रसाळ व चमकदार मोसंबीने पाचोडसहित उच्च बाजारपेठेतही आपली विशेष ख्याती निर्माण केली आहे. मागील वर्षीच्या मान्सून ऋतूत तालुक्यात वारंवार मुसळधार पाऊस व अतिवृष्टी झाली होती. जमीन खरडली गेली. फळ पिकांसाठी जमिनीत टाकलेले सूक्ष्म अन्नद्रव्य, खते व सेंद्रिय कर्बचा जमिनीत अति खोलवर निचरा झाला तर काही वाहून शेताबाहेर गेली. यामुळे त्याचा पिकासाठी काहीही उपयोग झाला नाही. सद्य:स्थितीत दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून दीर्घकाळ कडक उन्हामुळे कित्येक विहिरी व बोरवेल कोरडे पडले आहेत. लगडलेली फळे आतापासूनच बुरशी व अन्य रोगाने काळी पडत आहेत. उधार- उसनवारी करून बागा लावल्या कित्तेक शेतकऱ्यांनि उधार-उसनवारी करून मोसंबी बागा लावल्या होत्या. सुरुवातीला काही वर्ष बऱ्यापैकी उत्पादन मिळू लागले होते. मात्र यावर्षी विविध उपाययोजना करून व पाणी देऊनही रोगग्रस्त झाडे रोगमुक्त झाली नाहीत. अखेर बागच नष्ट करण्याचा निर्णय शेतकऱ्यांना घ्यावा लागला. या संकटात शेतकऱ्यांचे लाखांचे नुकसान झाले असून सध्या त्यांना इतर पिके घेण्यासाठी शेतजमीन पेरणीयोग्य करन्यावर भर द्यावा लागत मोठा नाहक खर्च करावा लागत आहे. शासनाने तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी पैठण तालुक्यातील जवळपास अनेक शेतकऱ्यांची परिस्थिती सारखीच बिकट झाली आहे. “शासनाने तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत व कर्जमाफी द्यावी,” अशी मागणी अनेक शेतकऱ्यांनि शासनाकडे केली आहे. दुष्काळाने मोसंबीची गोडी हिरावली असली, तरी शेतकऱ्यांची जिद्द अन्य पिके घेण्यासाठी अजूनही कायम आहे. परवडत नसल्याने मोसंबीवर चालवला जेसीबी पाच वर्षांपूर्वी चार एकरवर मोसंबी लावली होती. विविध खते, कीटकनाशके फवारणी केली होती. सुरुवातीला बरे उत्पन्न मिळाले. मात्र नंतर वारंवार रोगराई वाढतच गेली. ही रोगराई आटोक्यात येत नसल्याचे व बाजारभाव न परवडणारे राहत असल्याचे लक्षात येताच जेसीबी यंत्राच्या सहाय्याने मोसंबी बाग उपटून टाकली आहे. आता इतर पिके घेण्यासाठी शेतजमीन तयार करण्यावर भर देत आहे. -भाऊसाहेब थोरात, मोसंबी उत्पादक, ढोरकीन



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *