Headlines

टाकळीत आयसीएम कॉलेजचे एनएसएस शिबिर:स्वच्छता, प्रभातफेरी, वृक्षारोपण




प्रतिनिधी | ढोरकीन पैठण तालुक्यातील टाकळी येथे आयसीएम इंजिनिअरिंग कॉलेजतर्फे दोन दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर उत्साहात झाले. विद्यार्थ्यांनी श्रमदान केले. सामाजिक उपक्रम राबवले. ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले. नागरिकांनी सहकार्य केले. हे शिबिर दरवर्षी गावात घ्यावे, अशी मागणीही केली. पहिल्या दिवशी सामाजिक विषयांवरील जनजागृतीचे फलक घेऊन गावातून प्रभातफेरी काढली. स्वच्छ भारत, सुंदर भारत. पर्यावरण संवर्धन. अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. रणरणत्या उन्हातही विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावात स्वच्छता मोहीम राबवली. घामाच्या धारा वाहत असतानाही उत्साह कायम ठेवला. हे पाहून ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले. सायंकाळी ग्रामस्थांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम झाले. विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकणाऱ्या कलाकृती सादर केल्या. मनोरंजनासोबत प्रबोधन झाले. गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषद शाळेसमोरील सार्वजनिक मैदानावर वृक्षारोपण झाले. साकला नर्सरीचे संचालक सुरेश साकला प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या हस्ते गावातील शेतकऱ्यांना विविध रोपांचे वाटप झाले. निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यात आला. शिबिराच्या यशासाठी सरपंच पद्मा विजय गोरे, उपसरपंच अनुजा योगेश सोलाटे, माजी सरपंच विजय गोरे, योगेश सोलाटे, गंगाधर जाधव, गजानन लाटे, कडूबाळ सुसे, सखाराम सोलाटे, ज्ञानेश्वर छडीदार, अभय गोरे यांनी सहभाग नोंदवला. योगेश सोलाटे यांनी राहण्याची, जेवणाची उत्तम सोय केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *