![]()
कोणार्क कंपनीला शहरातील स्वच्छतेचे ३०० कोटींचे ७ वर्षांसाठी कंत्राट दिल्यापासून शहरातील स्वच्छतेबाबत ओरड सुरू असून, स्वच्छता कंत्राटदार वादग्रस्त ठरत आहे. याबाबत आयोगाच्या नियमांनुसार ‘कोणार्क’ पात्र आहे की नाही याचा तपास एका महिन्यात केला जाईल. यासाठी करारनाम्याची कागदपत्रे दिल्ली येथे नेऊन तपासली जातील. त्यानंतर निश्चितपणे आयोग कारवाई करेल, अशी ग्वाही मनपातील पत्रकार परिषदेत राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य (सचिव दर्जा) रवीकुमार कलोसे यांनी दिली. राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग हा मानवाधिकार आयोगाशी संलग्न आहे. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांवर अन्याय करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल. मी पुढच्या भेटीत जिल्हाधिकाऱ्यांपुढे नगर परिषद व जिल्हा परिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांबाबत बैठक घेणार आहे. त्यानंतर विभागीय आयुक्तांसोबत होणाऱ्या बैठकीत सर्वच बैठकींची समीक्षा केली जाईल. कोणी दोषी आढळले तर त्याच्याविरोधात कारवाई प्रस्तावित केली जाईल. जर कारवाई झाली नाही तर प्रधान सचिवांकडे तक्रार केली जाईल. माझी नियुक्ती ३१ मार्च २०२८ पर्यंत आहे. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मी पूर्ण प्रयत्न करीन, असेही कलोसे यांनी सांगितले. किमान वेतनाकरिता समितीची केली स्थापना सफाई कामगारांना नियमानुसार किमान वेतन दिले जाते की नाही, याबाबत मनपाच्या विधी अधिकाऱ्यांना काहीच सांगता आले नाही. काम करताना त्यांना सुरक्षा साधने मिळतात की नाही. की, ते स्वतःच साधने मिळाल्यानंतर त्यांचा वापर करीत नाहीत, याची चौकशी करण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेत मनपा आयुक्तांचा समावेश असलेली स्थापन केली आहे. ही समिती एका महिन्यात अहवाल देईल, अशी माहिती कलोसे यांनी दिली.
Source link
‘कोणार्क' शहराच्या स्वच्छतेसाठी पात्र की अपात्र, तपास करणार:सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य रवी कुमार कलोसेंची ग्वाही