![]()
महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी-कामगार संघटनेच्या मागण्यांसाठी तीन दिवसांपासून सुरू असलेला संप बुधवारी २५ नोव्हेंबरला अखेर मागे घेतला. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचारी व कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत आश्वासन दिले. त्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. महापालिकेचे पदाधिकारी, कर्मचारी-कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांत झालेल्या चर्चेत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. पदाधिकाऱ्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्या व मागण्या समजून घेत त्या सोडवण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या सकारात्मक चर्चेमुळे प्रशासन आणि कर्मचारी संघटना यांच्यात समन्वयाचे वातावरण निर्माण झाले असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संप मागे घेत कामकाज पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी महापौर श्रीचंद तेजवानी, महापालिका आयुक्त डॉ.मंगेश गोंदावले, उपमहापौर सचिन भेंडे, सभागृह नेते चेतन गावंडे, विरोधी पक्षनेते विलास इंगोले, नगरसेवक अजय जयस्वाल, महापालिका कर्मचारी व कामगार संघटनेचे अध्यक्ष रमेश पांडे, सरचिटणीस आकाश तीरथकर, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांची मनपा मुख्यालयात गर्दी ः दोन दिवसांपासून सुरू असलेले कामबंद आंदोलन मिटल्यानंतर जन्म-मृत्यू नोंदणीचे दाखल्यासह अर्जासाठी, मालमत्ता कराशी संबंधित कामे पूर्ण करणे, घर बांधकामाची परवानगी घेणे, पशू विभागाशी संबंधित परवाने मिळवणे व निविदा जारी करण्याचे कामे मार्गी लागली असून, नागरिकांनी कामासाठी मनपात गर्दी केली होती.
Source link
अमरावती येथील महानगरपालिकेचे अधिकारी- कर्मचारी परतले कामावर:पदाधिकाऱ्यांच्या सकारात्मक आश्वासनानंतर कामबंद आंदोलन स्थगित