Headlines

Laxman Hake Demands To Stop Ladki Bahin Scheme In Maharashtra


राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था असोत की जिल्हा सहकारी बँका असोत, प्रत्येक ठिकाणी ओबीसींच्या जागांवर मराठा-कुणबींचे अतिक्रमण झाले आहे. ते सत्ताधारी असल्याने सर्व काही ओरबाडून घेत आहेत आणि ओबीसी समाज फक्त तोंडावर हात ठेवून याचकाच्या भूमिकेत दिसून येत

.

लक्ष्मण हाके म्हणाले की, सरकारने लाडकी बहीण योजना बंद करावी. माता-भगिनींनी बँकेत जाऊन पैसे काढण्यापेक्षा त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आणि मुलींना रोजगार मिळेल, असे धोरण सरकारने राबवले पाहिजे. आम्हाला घरी बसून काही देऊ नका. नरहरी झिरवाळ यांनी शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी त्यांना थेट पैसे देण्यापेक्षा पशुधनासाठी चारा कसा उपलब्ध करता येईल आणि बळीराजापर्यंत दुष्काळाच्या झळा पोहोचू नयेत, यासाठी काहीतरी उपाययोजना केली पाहिजे.

ओबीसी आरक्षण उरले कुठे?

लक्ष्मण हाके म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी आमच्याकडे त्यांचा प्रतिनिधी पाठवावा; आम्ही त्यांना ओबीसींच्या किती जागांवर कोण निवडून गेले आहे, याची अनेक उदाहरणे देऊ शकतो. सोलापूर जिल्हा बँक आणि सातारा जिल्हा बँकेच्या ओबीसींच्या जागांवर कोण गेले, हे बघितले पाहिजे. मग ओबीसी आरक्षण कुठे आहे असा प्रश्न पडेल.

सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहावे

लक्ष्मण हाके म्हणाले की, सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. महाराष्ट्रात भयावह परिस्थिती आहे. सरकारने केवळ कागदोपत्री धोरणे जाहीर केल्याने काही होणार नाही; शेतकऱ्यांचे पशुधन कसे वाचेल आणि त्यांच्या पाठीशी कसे उभे राहता येईल, अशा योजना आखल्या पाहिजेत. सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजारांची अग्रिम मदत करणार असल्याचे जाहीर केले होते, पण दिवाळी होऊन 15 दिवस उलटल्यानंतरही काही शेतकऱ्यांना ती मदत मिळालेली नाही. शासनाने बाकीचे प्रकल्प थांबवून आधी शेतकऱ्यांना वाचवले पाहिजे. सरकारने दिलेल्या 5 हजारांच्या मदतीने काहीही होत नाही. शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी देत त्यांचे पशुधन वाचवण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत.

..तर आम्ही आंदोलन करू

लक्ष्मण हाके म्हणाले की, अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाच्या कामात ठेकेदाराने पैसे कमवण्यापेक्षा ते काम किती चांगले होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावर कुठेही राजकारण होऊ नये, हीच आमची अपेक्षा आहे. ठेकेदाराने काम करताना कोणावर आंदोलन करण्याची वेळ येऊ नये असे काम करावे. जर यानंतरही काही गैरप्रकार होत असतील, तर आम्ही आंदोलन करू,असा इशाराही लक्ष्मण हाके यांनी दिला.

हे ही वृत्त वाचा

विद्येचे माहेरघर आता गुंडांचे माहेरघर झाले:राज्यात कायद्याचे राज्य राहिले नाही, गृहमंत्रालय अपयशी, भाजपकडून गुंडांना आश्रय, मुंबईतील व्यापारी दहशतीखाली- संजय राऊत

पुणे हे विद्येचे माहेरघर होते, ते आता गुंडांचे माहेरघर झाले आहे. पुण्याचे पालकमंत्री कोण आहेत? नागपुरातसुद्धा असेच वातावरण आहे. राज्यात कायद्याचे राज्य नाही, म्हणजेच गृहमंत्रालय अपयशी ठरले आहे असा त्याचा अर्थ होतो. ज्यांच्याकडे हे खाते आहे, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.