![]()
महावितरणच्या २०२६-२७ च्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर परिमंडल संघाने वर्चस्व गाजवत सर्वसाधारण अजिंक्यपद पटकावले. तर पुणे-बारामती व नागपूर-चंद्रपूर-गोंदिया परिमंडल संघाना स्पर्धेतील उपविजेतेपद विभागून देण्यात आले. यावेळी महावितरणचे संचालक राजेंद्र पवार (मानव संसाधन) व कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे(भा.प्र.से) यांच्या हस्ते अजिंक्यपदाचा करंडक विजेत्या संघास देण्यात आला. महावितरणच्या कोल्हापूर येथे दि.२१ नोव्हेंबरपासून साधेपणाने आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेचा समारोप मंगळवारी (दि. २४) सायंकाळी पोलीस ग्राऊंड, कसबा बावडा येथे झाला. यावेळी महावितरणचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे, नागपूर प्रादेशिक संचालक(प्रभारी) राजेश नाईक, मुख्य अभियंते पंकज तगलपल्लेवार, धर्मराज पेठकर, दत्तात्रय बनसोडे, दिलीप दोडके, संजय पाटील, हरीश गजबे, अरविंद बुलबुले, स्वप्नील काटकर, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत महावितरणच्या १६ परिमंडलाच्या संयुक्त आठ संघातील १२४६ खेळाडूपैकी ४०१ महिला व ८४५ पुरुष खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेतील सांघिक व वैयक्तिक विजेते व उपविजेत्यांना करंडक व सुवर्ण/रौप्य/कांस्य पदक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी केले. सूत्रसंचालन रामगोपाल अहिर, बाजीराव आबिटकर व सुरेश पाटील यांनी केले. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर यांनी आभार मानले. सांघिक खेळांचे अंतिम निकाल (अनुक्रमे: विजेता व उपविजेता) क्रिकेट: कल्याण-रत्नागिरी (विजेता) व छत्रपती संभाजीनगर-नांदेड-लातूर (उपविजेता) व्हॉलिबॉल: कोल्हापूर (विजेता) व पुणे-बारामती (उपविजेता) कबड्डी – पुरुष: मुख्य कार्यालय-भांडूप (विजेता) व पुणे-बारामती (उपविजेता) कबड्डी – महिला: मुख्य कार्यालय-भांडूप (विजेता) व पुणे-बारामती (उपविजेता) खो-खो – पुरुष: पुणे-बारामती (विजेता) व कोल्हापूर (उपविजेता) खो-खो – महिला: मुख्य कार्यालय-भांडूप (विजेता) व कोल्हापूर (उपविजेता) टेबल टेनिस – पुरुष: छत्रपती संभाजीनगर-नांदेड-लातूर (विजेता) व नाशिक-जळगाव (उपविजेता) टेबल टेनिस – महिला: नागपूर-गोंदिया-चंद्रपूर (विजेता) व कोल्हापूर (उपविजेता) बॅडमिंटन – पुरुष: पुणे-बारामती (विजेता) व कल्याण-रत्नागिरी (उपविजेता) बॅडमिंटन – महिला: कोल्हापूर (विजेता) व नागपूर-गोंदिया-चंद्रपूर (उपविजेता) कॅरम – पुरुष: छत्रपती संभाजीनगर-नांदेड-लातूर (विजेता) व नागपूर-गोंदिया-चंद्रपूर (उपविजेता) कॅरम – महिला: नागपूर-गोंदिया-चंद्रपूर (विजेता) व कल्याण-रत्नागिरी (उपविजेता) ब्रिज: नागपूर-गोंदिया-चंद्रपूर (विजेता) व कोल्हापूर (उपविजेता) टेनिक्वाईट – महिला: कोल्हापूर (विजेता) व नागपूर-गोंदिया-चंद्रपूर (उपविजेता) कुस्ती: कोल्हापूर (विजेता) व पुणे-बारामती (उपविजेता) पॉवर लिफ्टिंग: नाशिक-जळगाव (विजेता) व नागपूर-गोंदिया-चंद्रपूर (उपविजेता) शरीरसौष्ठव: कोल्हापूर (विजेता) व कल्याण-रत्नागिरी (उपविजेता) वैयक्तिक खेळांचे अंतिम निकाल (अनुक्रमे: प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक) मैदानी व ट्रॅक स्पर्धा १०० मीटर धावणे – पुरुष: १ला: गुलाबसिंग वसावे (पुणे-बारामती) २रा: शुभम निंबाळकर (कोल्हापूर) ३रा: चंद्रशेखर हेमने (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर) १०० मीटर धावणे – महिला: १ली: प्रिया पाटील (मुख्य कार्यालय-भांडूप) २री: भारती राऊत (कल्याण-रत्नागिरी) ३री: संजना शेजाळ (पुणे-बारामती) २०० मीटर धावणे – पुरुष: १ला: गुलाबसिंग वसावे (पुणे-बारामती) २रा: चंद्रशेखर हेमने (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर) ३रा: साईनाथ मसणे (मुख्य कार्यालय-भांडूप) २०० मीटर धावणे – महिला: १ली: प्रिया पाटील (मुख्य कार्यालय-भांडूप) २री: मेघा जुनघरे (कल्याण-रत्नागिरी) ३री: आसावरी जाधव (पुणे-बारामती) ४०० मीटर धावणे – पुरुष: १ला: प्रतिक वाईकर (पुणे-बारामती) २रा: चंद्रशेखर हेमने (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर) ३रा: अथर्व कोळी (कोल्हापूर) ४०० मीटर धावणे – महिला: १ली: रागिनी बेले (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर) २री: भक्ती लोमटे (पुणे-बारामती) ३री: स्नेहल धारवे (कोल्हापूर) ८०० मीटर धावणे – पुरुष: १ला: भाविक भौईर (मुख्य कार्यालय-भांडूप) २रा: परेश चौधरी (नाशिक-जळगाव) ३रा: चंद्रशेखर हेमने (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर) ८०० मीटर धावणे – महिला: १ली: प्रिया पाटील (मुख्य कार्यालय-भांडूप) २री: संजना शेजाळ (पुणे-बारामती) ३री: स्वाती दमाहे (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर) १५०० मीटर धावणे – पुरुष: १ला: एकनाथ घंगाळे (नाशिक-जळगाव) २रा: अथर्व कोळी (कोल्हापूर) ३रा: हर्षल बोंडरे (पुणे-बारामती) १५०० मीटर धावणे – महिला: १ली: प्रिया पाटील (मुख्य कार्यालय-भांडूप) २री: संजना शेजाळ (पुणे-बारामती) ३री: रागिनी बेले (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर) ५००० मीटर धावणे – पुरुष: १ला: एकनाथ घंगाळे (नाशिक-जळगाव) २रा: आल्हाद निस्ताने (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर) ३रा: निवास धनगर (कोल्हापूर) ४ बाय १०० रिले – पुरुष: १ला: शुभम निंबाळकर, अथर्व कोळी, वैभव माने, प्रदीप वंजारे (कोल्हापूर) २रा: विराज कोथमकर, भाविक भोईर, रुपेश सकपाळ, साईनाथ मासणे (मुख्य कार्यालय-भांडूप) ३रा: गमेरसिंग वसावे, एकनाथ घांगले, रोशन बागुल, छगन भुरे (नाशिक-जळगाव) ४ बाय १०० रिले – महिला: १ली: संजना शेजाळ, प्रिती गायकवाड, तेजस्विनी सोनोने, आशावरी जाधव (पुणे-बारामती) २री: मेघा जुनघरे, संपदा कोत्रे, भारती राऊत, अरशिया शेख (कल्याण-रत्नागिरी) ३री: स्वाती दमाहे, रागिनी बेले, संगिता फुंडे, वेदश्री सोनावने (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर) गोळा फेक – पुरुष: १ला: प्रवीण बोरावके (पुणे-बारामती) २रा: इम्रान मुजावर (कोल्हापूर) ३रा: दिपक पाटील (नाशिक-जळगाव) गोळा फेक – महिला: १ली: पूजा ऐनापुरे (कोल्हापूर) २री: प्रियांका शेळके (नाशिक-जळगाव) ३री: हर्षला मोरे (कल्याण-रत्नागिरी) थाळी फेक – पुरुष: १ला: धर्मेंद्र पाटील (नाशिक-जळगाव) २रा: इम्रान मुजावर (कोल्हापूर) ३रा: शरणजीत पुजारी (छत्रपती संभाजीनगर-नांदेड-लातूर) थाळी फेक – महिला: १ली: ज्योती कांबळे (कोल्हापूर) २री: हिना कुराने (पुणे-बारामती) ३री: प्रियंका शेळके (नाशिक-जळगाव) भाला फेक – पुरुष: १ला: सचिन चव्हाण (कोल्हापूर) २रा: भरत उकलकर (नाशिक-जळगाव) ३रा: मिलिंद डाफळे (कल्याण-रत्नागिरी) भाला फेक – महिला: १ली: सरिता सरोटे (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर) २री: मनीषा साबळे (पुणे-बारामती) ३री: हर्षला मोरे (कल्याण-रत्नागिरी) लांब उडी – पुरुष: १ला: शुभम निंबाळकर (कोल्हापूर) २रा: निलेश वैद्य (अकोला-अमरावती) ३रा: अक्षय केंगळे (पुणे-बारामती) लांब उडी – महिला: १ली: भारती राऊत (कल्याण-रत्नागिरी) २री: प्रिया पाटील (मुख्य कार्यालय-भांडूप) ३री: सरिता सरोटे (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर) उंच उडी – पुरुष: १ला: सतीश पाटील (कोल्हापूर) २रा: समीर मन्सुरी (नाशिक-जळगाव) ३रा: निवास जाधव (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर) उंच उडी – महिला: १ली: सोनाली मोरे (मुख्य कार्यालय-भांडूप) २री: सुप्रिया जोगडे (अकोला-अमरावती) ३री: अश्विनी देसाई (कोल्हापूर) बुद्धिबळ, कॅरम व टेनिक्वाईट बुद्धिबळ – पुरुष: १ला राहुल कुरवे (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर), २रा संदिप बागुल (नाशिक-जळगाव) बुद्धिबळ – महिला: १ली अमृता जोशी (मुख्य कार्यालय-भांडूप), २री श्रेया राऊत (अकोला-अमरावती) कॅरम – पुरुष: १ला सुमित पाटील (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर), २रा अंकित बैसारे (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर) कॅरम – महिला: १ली पुष्पलता हेडाऊ (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर), २री मनिषा चौकसे (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर) कॅरम – पुरुष दुहेरी: १ला गणेश कस्तुरे-संजय कांबळे (पुणे-बारामती), २रा अंकित बैसारे-इम्रान शेख (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर) कॅरम – महिला दुहेरी: १ली पुष्पलता हेडाऊ-मनीषा चौकसे (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर), २री पूजा पाटील-तेजश्री गायकवाड (मुख्य कार्यालय-भांडूप) टेनिक्वाईट – महिला एकेरी: १ली पुनम वाघाडे (अकोला-अमरावती), २री पुजा ऐनापुरे (कोल्हापूर) टेनिक्वाईट – महिला दुहेरी: १ली प्रतिमा भालेराव-भाग्यश्री कदम (छत्रपती संभाजीनगर-नांदेड-लातूर), २री समिधा लोहरे-नेहा हेमने (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर) कुस्ती ५७ किलो: १ला सुदर्शन पाटील (कोल्हापूर), २रा शरद मोकले (छत्रपती संभाजीनगर-नांदेड-लातूर) ६१ किलो: १ला अश्विन म्हाटे (पुणे-बारामती), २रा विवेक रावटे (कोल्हापूर) ६५ किलो: १ला राजकुमार काळे (पुणे-बारामती), २रा सुर्यकांत गायकवाड (नाशिक-जळगाव) ७० किलो: १ला विनोद गायकवाड (अकोला-अमरावती), २रा सचिन पाटील (नाशिक-जळगाव) ७४ किलो: १ला स्वप्निल गावडे (पुणे-बारामती), २रा गुरुप्रसाद देसाई (कोल्हापूर) ७९ किलो: १ला संदिप सावंत (कोल्हापूर), २रा अकिल मुजावर (पुणे-बारामती) ८६ किलो: १ला ज्योतिबा ओऊळकर (कोल्हापूर), २रा सुनिल महाडिक (नाशिक-जळगाव) ९२ किलो: १ला अमोल गवळी (पुणे-बारामती), २रा शिवाजी कोळी (कोल्हापूर) ९७ किलो: १ला हणमंत कदम (कोल्हापूर), २रा महेश कोळी (पुणे-बारामती) १२५ किलो: १ला प्रमोद ढेरे (कोल्हापूर), २रा चंद्रकांत बागवाल (पुणे-बारामती) शरीरसौष्ठव ६५ किलो: १ला सुनीलकुमार नन्हेट (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर), २रा रोशन गायकवाड (कल्याण-रत्नागिरी) ७० किलो: १ला अमित पाटील (कोल्हापूर), २रा गोपाल कुलकर्णी (कल्याण-रत्नागिरी) ७५ किलो: १ला शुभम निंबाळकर (कोल्हापूर), २रा राजेंद्र जाधव (कल्याण-रत्नागिरी) ८० किलो: १ला प्रविण घुणके (कोल्हापूर), २रा समाधान मस्के (छत्रपती संभाजीनगर-नांदेड-लातूर) ९० किलो: १ला राहुल कांबळे (कोल्हापूर), २रा सौरभ पाटील (छत्रपती संभाजीनगर-नांदेड-लातूर) १०० किलो: १ला सागर खंडारे (कोल्हापूर), २रा मोहम्मद अन्वर (अमरावती-अकोला) पॉवर लिफ्टिंग ५९ किलो: १ला रवी मिरगणे (छत्रपती संभाजीनगर-नांदेड-लातूर), २रा दीपक गांगुर्डे (नाशिक-जळगाव) ६६ किलो: १ला तेजस आभाळे (अकोला-अमरावती), २रा राजेंद्र राठोड (छत्रपती संभाजीनगर-नांदेड-लातूर) ७४ किलो: १ला आयुष नंदागवळी (नाशिक-जळगाव), २रा सागर जगताप (कोल्हापूर) ८३ किलो: १ला दिनेश धाडे (नाशिक-जळगाव), २रा महेश सावरकर (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर) ९३ किलो: १ला महेश इंगोले (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर), २रा योगेश रहाटे (कल्याण-रत्नागिरी) १०५ किलो: १ला श्रीकृष्ण इंगोले (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर), २रा प्रसाद हिरे (नाशिक-जळगाव) टेबल टेनिस, बॅडमिंटन व ब्रिज टेबल टेनिस – पुरुष एकेरी: १ला अतुल दंडवते (पुणे-बारामती), २रा किरणकुमार पवार (छत्रपती संभाजीनगर-नांदेड-लातूर) टेबल टेनिस – पुरुष दुहेरी: १ला रोहन श्रीरामवार-किरणकुमार पवार (छत्रपती संभाजीनगर-नांदेड-लातूर), २रा विजय चव्हाण-मंगेश प्रजापती (नाशिक-जळगाव) टेबल टेनिस – महिला एकेरी: १ली स्नेहल बढे (अकोला-अमरावती), २री अमृता गुरव (पुणे-बारामती) टेबल टेनिस – महिला दुहेरी: १ली मनिषा बुरांडे-स्नेहल बढे (अकोला-अमरावती), २री अपर्णा महाडिक-विजया माळी (कोल्हापूर) बॅडमिंटन – पुरुष एकेरी: १ला भारत वशिष्ठ (पुणे-बारामती), २रा इम्रान तासगावकर (कोल्हापूर) बॅडमिंटन – पुरुष दुहेरी: १ला भरत वसिष्ठ-पंकज पाठक (पुणे-बारामती), २रा मनिष कोठाणे-जॉन कोशी (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर) बॅडमिंटन – महिला एकेरी: १ली ऋतिका नायडू (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर), २री चैत्रा पै (कोल्हापूर) बॅडमिंटन – महिला दुहेरी: १ली ऋतिका नायडू-रिना सागदेव (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर), २री चैत्रा पै-विदुला पाटील (कोल्हापूर) ब्रिज – जोडी: १ला विजय पाटील-तेजस शहा (कल्याण-रत्नागिरी), २रा ब्रजेश गुप्ता-प्रशांत झाडे (अकोला-अमरावती) वैयक्तिक खेळांचे अंतिम निकाल (४५ वर्षांवरील) (अनुक्रमे: प्रथम व द्वितीय क्रमांक) टेनिक्वाईट – महिला एकेरी: १ली प्रतिमा भालेराव (छत्रपती संभाजीनगर-नांदेड-लातूर), २री स्वाती देशमुख (मुख्य कार्यालय-भांडूप) टेबल टेनिस – पुरुष एकेरी: १ला अतुल दंडवते (पुणे-बारामती), २रा किरणकुमार पवार (छत्रपती संभाजीनगर-नांदेड-लातूर) टेबल टेनिस – महिला एकेरी: १ली स्नेहल बढे (अकोला-अमरावती), २री अमृता गुरव (पुणे-बारामती) टेबल टेनिस – पुरुष सांघिक: १ला रितेश सव्वालाखे, अतुल बोकाळे, आशिष मानकर (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर), २रा विशाल नंदगावे, स्वप्नील गोटमारे, भुजंग खंदारे (मुख्य कार्यालय-भांडूप) टेबल टेनिस – महिला सांघिक: १ली पुनम रोकडे, गीता काळे, सारिका साळोखे (कोल्हापूर), २री अर्चना मोरे, विद्या पाटील, सुषमा हजारे (नाशिक-जळगाव) बॅडमिंटन – पुरुष एकेरी: १ला अविनाश जाधव (मुख्य कार्यालय-भांडूप), २रा राहुल मुळे (छत्रपती संभाजीनगर-नांदेड-लातूर) बॅडमिंटन – महिला एकेरी: १ली विशाखा गायकवाड (कल्याण-रत्नागिरी), २री सुप्रिया वस्त्रद (पुणे-बारामती) बॅडमिंटन – पुरुष दुहेरी: १ला संजय गोताड-परिक्षित उदगावे (कोल्हापूर), २रा संजय पाटील-नितीन सांगोले (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर) बॅडमिंटन – महिला दुहेरी: १ली कमलरुख दारूखनवाला-रशमी पांडे (मुख्य कार्यालय-भांडूप), २री पुनम रोकडे-गिता काळे (कोल्हापूर).
Source link
महावितरण राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा:कोल्हापूर परिमंडल संघाला अजिंक्यपद; नागपूर-चंद्रपूर-गोंदिया परिमंडल अन् पुणे-बारामती संघ उपविजेता