Headlines

घाटीच्या नेत्र विभागात 14 कोटींची यंत्रसामग्री येणार: डायबेटिक रेटिनोपॅथी शिबिरात 256 रुग्णांची तपासणी; 32 जणांना विकार आढळला



छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) नेत्र विभागात लवकरच 14 कोटी रुपयांची यंत्रसामग्री येणार आहे. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी डायबेटिक रेटिनोपॅथी तपासणी शिबिराच्या उद्घाटनावेळी ही माहिती दिली.

.

मधुमेह जनजागृती महिन्यानिमित्त महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटना, औरंगाबाद नेत्रतज्ञ संघटना आणि घाटीच्या नेत्रशल्यचिकित्सा विभागाने संयुक्तपणे शिबिर आयोजित केले. गुरुवार, 26 तारखेला सकाळी 11 वाजता नेत्र बाह्यरुग्ण विभाग क्रमांक 107 येथे डॉ. सुक्रे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. त्यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले.

शिबिरात नोंदणी केलेल्या 256 मधुमेही रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली. त्यापैकी 32 जणांमध्ये डायबेटिक रेटिनोपॅथी आढळली. औरंगाबाद नेत्रतज्ञ संघटनेने उपलब्ध करून दिलेल्या फंडस कॅमेऱ्याने रुग्णांच्या नेत्रपटलाची छायाचित्रे घेण्यात आली.

अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, विभागप्रमुख डॉ. अर्चना पाटील वरे, डॉ. जगदीश लोया आणि डॉ. वैशाली उणे-लोखंडे यांनी नेत्रपटल तपासणीचे महत्त्व सांगितले. या विकाराचे वेळेत निदान आणि उपचार न झाल्यास दृष्टी कमी होऊ शकते किंवा जाऊ शकते. त्यामुळे मधुमेह असलेल्या प्रत्येक रुग्णाने नियमित नेत्रपटल तपासणी करावी, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला उपअधिष्ठाता (प्रशासन) डॉ. काशिनाथ गर्कळ, उपअधिष्ठाता (पदवीपूर्व) डॉ. विनोद मुंदडा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, औरंगाबाद नेत्रतज्ञ संघटनेचे सचिव डॉ. जगदीश लोया आणि कोषाध्यक्ष डॉ. अभिजीत गोरे उपस्थित होते.

नेत्रशल्यचिकित्सा विभागाच्या प्राध्यापिका आणि विभागप्रमुख तसेच औरंगाबाद नेत्रतज्ञ संघटनेच्या वैज्ञानिक समितीच्या अध्यक्ष डॉ. अर्चना पाटील वरे उपस्थित होत्या. महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेच्या सचिव डॉ. वैशाली उणे-लोखंडे, सहयोगी प्राध्यापक डॉ. संगीता पाटील, डॉ. अमरनाथ आवरगांवकर, डॉ. तपन जक्कल, डॉ. वेणुगोपाल रंगू, डॉ. महेश सोनपेठकर, डॉ. सरोश सय्यद, डॉ. मोहन मोरखडे, डॉ. सनीरा वळसे आणि डॉ. इमरान खानही उपस्थित होते. विभागातील वरिष्ठ आणि कनिष्ठ निवासी डॉक्टरही कार्यक्रमाला आले होते.

वार्धक्यशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका आणि विभागप्रमुख डॉ. शैलजा राव, स्त्रीरोगशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. सोनाली देशपांडे, शरीरक्रियाशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका आणि विभागप्रमुख डॉ. अंजली शेटे, तसेच शरीररचनाशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. स्वप्ना आंबेकर उपस्थित होत्या. मेट्रन संजीवनी गायकवाड, नेत्रशल्यचिकित्सा विभागातील परिचारिका आणि अनेक रुग्णही उपस्थित होते. डॉ. तन्वी करांडे यांनी सूत्रसंचालन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *