Headlines

पुण्यातील कॅम्प परिसरात खळबळ: 15 ऑगस्ट चौकात बँकेबाहेर सापडली बेवारस बॅग, बीडीडीएस पथक दाखल – Pune Camp Bomb Threat; Suspicious Bag Found Near Bank



पुणे शहरातील कॅम्प परिसरातील गजबजलेल्या 15 ऑगस्ट चौकात बँकेबाहेर बेवारस बॅग आढळल्याने एकच खळबळ उडाली. संशयास्पद बॅग असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच बॉम्बशोधक व नाशक पथकाला (बीडीडीएस) पाचारण करण्यात आले. या घटनेमुळे

.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, 15 ऑगस्ट चौकातील एका बँकेबाहेर ही बॅग बेवारस अवस्थेत पडलेली होती. बँकेतील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही बॅग आल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. सध्या कॅम्प परिसरात नागरिकांची आणि वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने हालचाली सुरू केल्या.

पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर परिसराची पाहणी करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून संशयास्पद बॅगची तपासणी करण्यासाठी बॉम्बशोधक व नाशक पथकाला बोलावण्यात आले. बॅगमध्ये नेमके काय आहे, ती कोणी आणि कोणत्या कारणासाठी तेथे ठेवली, याचा तपास सुरू करण्यात आला.

या प्रकारामुळे संबंधित भागांमध्ये नागरिकांनी सदर घटना पाहण्यासाठी गर्दी केली मात्र पोलिसांनी आवश्यक तो बंदोबस्त ठेवून नागरिकांना संशोध बँक पासून दूर राहण्याचे आवाहन केले. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी बेवारस वस्तू आढळल्यास नागरिकांनी स्वतःहून त्याला हात न लावता तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *