“मराठा आरक्षणाच्या आंदोलनातून पुढे आलेले मनोज जरांगे पाटील यांची दिशा आता पूर्णपणे भरकटली असून, ते कोणाची तरी ‘सुपारी’ घेऊन काम करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चुकीच्या पद्धतीने लक्ष्य करून बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे; मात्र हा
.
एसआयटी (SIT) चौकशी सुरू झाल्यामुळे जरांगे पाटलांच्या पेनड्राईव्हचा मूळ स्त्रोत (सोर्स) आता लपून राहणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. यासोबतच राज्यातील 18.5 लाख पोलीस भरती उमेदवारांसाठी शिवसेनेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘मिशन खाकी’ उपक्रमाची माहिती देत, पुण्यात गुंडांची नव्हे तर केवळ पोलिसांचीच दादागिरी चालेल, असा सज्जड इशाराही योगेश कदम यांनी दिला.
जरांगेंचा हेतू समाजहिताचा नाही
काल (26 नोव्हेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. यावर योगेश कदम यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आमच्या सरकारने मराठा समाजाच्या हितासाठी जेवढे निर्णय घेतले, तेवढे निर्णय आजवरच्या इतिहासात कोणीही घेतले नाहीत. सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांनी उठाव केला तेव्हा सरकारने अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला; मात्र आता त्यांचे आंदोलन समाजहिताचे राहिले नसून त्यांची दिशा भरकटली आहे.
पेनड्राईव्हचा सोर्स एसआयटी चौकशीत समोर येणारच
जरांगे पाटील यांनी अद्याप आपल्या पेनड्राईव्हचा सोर्स जाहीर केलेला नाही आणि येत्या 1.5 महिन्यांत सर्व नावे जनतेसमोर आणणार असल्याचे ते सांगत आहेत. मात्र, आता या प्रकरणी एसआयटी चौकशी सुरू झाली आहे. तपासानंतर सर्व सत्य आणि यामागचा मूळ स्त्रोत लपून राहणार नाही, तो नक्कीच महाराष्ट्रासमोर येईल.

18.5 लाख विद्यार्थ्यांसाठी शिवसेनेचे ‘मिशन खाकी’
शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या देखरेखीखाली राज्यभरात सुरू करण्यात आलेल्या ‘मिशन खाकी’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची माहिती योगेश कदम यांनी दिली. मागील पोलीस भरतीच्या वेळी राज्यातून सुमारे 18.5 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते आणि मैदानी चाचणी दिली होती. अनेकदा तालुका आणि जिल्हा स्तरावर सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपुऱ्या सुविधांना सामोरे जावे लागते.
शेकडो अकॅडमींना सोबत घेऊन शासनाची मदत मिळवून देणार
पोलीस भरतीमध्ये 50 मार्क मैदानी चाचणीसाठी तर 100 मार्क लेखी परीक्षेसाठी असतात. राज्यात शेकडो अकॅडमी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना सरावासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना पक्षाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन खाकी’ राबवले जाणार आहे.
पुण्यात गुंडांची नव्हे, तर पोलिसांचीच दादागिरी चालेल
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेरील हल्ला आणि पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादावरही राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट भूमिका मांडली. पुण्यातील गुन्हेगारीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (26/11 च्या निमित्ताने) स्पष्ट भूमिका मांडली असून पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. ज्येष्ठ निवृत्त आयपीएस (IPS) अधिकारी राकेश मारिया एकदा मुंबईबाबत म्हणाले होते की, “इथे दादागिरी फक्त पोलिसांची चालेल, गुंडांची नाही.” त्याच धर्तीवर पुण्यात कोणी दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याला पोलीस सडेतोड उत्तर देतील आणि प्रशासनाला सर्व ताकद देण्याची आमची तयारी आहे.
पालकमंत्री पदाचा वाद जाणीवपूर्वक निर्माण केला जातोय
पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार (सुनेत्रा वहिनी) या संपूर्ण जिल्ह्याचा कारभार अत्यंत योग्य रीतीने हाताळत आहेत. मुख्यमंत्र्यांनी पुण्याचे पालकत्व घ्यावे असा कोणताही वाद महायुतीत नाही; विरोधकांकडून हा वाद जाणीवपूर्वक निर्माण केला जात आहे, असेही कदम यांनी स्पष्ट केले.
—————————————————-
हेही वाचा…
पालकत्व आणि पालकमंत्री यातील फरक समजून घ्या: सुनेत्रा वहिनी मोठ्या भावाच्या पत्नी; भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर आमदार रोहित पवार यांनी केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) महिला आघाडीने पुणे व मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला असतानाच, खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी (27 नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत अत्यंत समंजस भूमिका घेत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी