Headlines

2009 मध्ये काँग्रेसनेच डिलिमिटेशन केले, मग त्यांनाही देशद्रोही ठरवा: नितेश राणे यांची संजय राऊतांवर टीका, म्हणाले- दर 25 वर्षांनी पुनर्रचना आवश्यकच


खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांवरून भाजपवर टीका करणारे शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांच्यावर आमदार नितेश राणे यांनी शुक्रवारी (27 नोव्हेंबर) सिंधुदुर्गात आयोजित पत्रकार परिषदेत अत्यंत बोचऱ्या शब्दांत पलटवार केला आहे. “10 आ

.

2009 मध्ये काँग्रेसच्या काळातच डिलिमिटेशन झाले; मग काँग्रेसलाही देशद्रोही जाहीर करा

डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकाला पाठिंबा देणे ही 21 व्या शतकातील सर्वात मोठी गद्दारी ठरेल, या संजय राऊत यांच्या विधानाचा नितेश राणे यांनी इतिहासाचा दाखला देत समाचार घेतला. डिलिमिटेशन कायदा काही पहिल्यांदाच येत नाहीये. 2009 मध्ये केंद्रात काँग्रेसचे सरकार असतानाच डिलिमिटेशन झाले होते आणि त्याच निवडणुकीत मी लोकसभेचा खासदार झालो होतो. त्यापूर्वी सुरेश प्रभू यांचा मतदारसंघ राजापूर-संगमेश्वरपर्यंत होता, तो पुनर्रचनेनंतर चिपळूणपर्यंत गेला.

दर 25 वर्षांनी पुनर्रचना आवश्यकच

लोकसंख्या आणि जनगणनेच्या आधारावर दर 25 वर्षांनी मतदारसंघांची पुनर्रचना करणे हा संविधानाचा भाग आहे. जर डिलिमिटेशन करणे हा देशद्रोह असेल, तर संजय राऊत यांनी आधी काँग्रेसला देशद्रोही जाहीर करावे. तसेच, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नावावर सर्वाधिक दिवस सभागृह चालू न देण्याचा मूर्खपणाचा विक्रम नोंदवला गेला आहे; त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी सभागृहात चर्चा करावी, असे आव्हान राणे यांनी दिले.

सौरभ दासला लूकआऊट नोटीस अगदी योग्यच

गांधी जयंती आंदोलनाशी संबंधित सौरभ दास याच्यावर जारी करण्यात आलेल्या लूकआऊट नोटीसचे नितेश राणे यांनी जोरदार समर्थन केले. ही लूकआऊट नोटीस सौरभ दासवर काढण्यात आली आहे. तो सध्या परदेशात म्हणजेच लंडनला गेला आहे. लेक्चरच्या नावाखाली तो तिथे गेला असला, तरी लंडनचे तिकीट 5 लाख रुपयांच्या खाली नाही; हा कुठे नोकरी करतो आणि याचे फंडिंग कोठून होते, याचा तपास झाला पाहिजे. ‘तुकडे-तुकडे गँग’ची मानसिकता असलेले हे लोक लंडनमध्ये जाऊन पाकिस्तान किंवा चीन पुरस्कृत भारतविरोधी मंडळींना भेटण्याची शक्यता नाकारता येत नाही; त्यामुळे त्याच्यावर काढलेली लूकआऊट नोटीस अगदी योग्य आहे.

संदीप देशपांडेंनी ‘राजगड’ कार्यालयातील मारहाणीचाही व्हिडिओ टाकावा

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना शाखाप्रमुखाचा 50 लाख रुपयांच्या रोकडसह दोन वर्षांपूर्वीचा व्हिडिओ ट्वीट केल्यावरून नितेश राणे यांनी प्रतिहल्ला चढवला. संदीप देशपांडे यांना नको ते व्हिडिओ काढण्याची सवय आहे. 2 वर्षांपूर्वीच्या निवडणुकीचा हा व्हिडिओ आता अचानक बाहेर काढला गेला आहे; तो एडिट केलेला आहे की खरा, याची आधी फॉरेन्सिक तपासणी झाली पाहिजे.

दादरच्या ‘राजगड’ कार्यालयातील घटनेची आठवण

संदीप देशपांडेंना व्हिडिओच टाकायचे असतील, तर त्यांनी दादर येथील त्यांच्या ‘राजगड’ कार्यालयात मनसेच्याच एका कार्यकर्त्याला झालेल्या बेदम मारहाणीचा व्हिडिओही बाहेर काढावा. फाटलेल्या कपड्यांतून कसाबसा निसटून त्या कार्यकर्त्याने वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर जाऊन काढलेला व्हिडिओ आजही सोशल मीडियावर उपलब्ध आहे, असा टोला राणे यांनी लगावला.

उत्तर प्रदेशातील 30 जागा व गोव्यातही शिवसेना लढणार

या पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी पक्षाचा राष्ट्रीय विस्तार आणि कोकणातील प्रकल्पांबाबतही महत्त्वाची माहिती दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा विस्तार महाराष्ट्राबाहेर वेगाने होत आहे. गेल्या 1 ते 1.5 वर्षांत शिंदे साहेबांनी अनेकदा काशी आणि वाराणसीचे दौरे केल्यामुळे तिथे कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार झाली आहे. आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सुमारे 30 जागांवर आणि गोव्यातही जिथे कार्यकर्ते प्रबळ आहेत तिथे निवडणूक लढवण्याची तयारी सुरू असून अंतिम निर्णय शिंदे साहेब घेतील.

शक्तिपीठ महामार्ग व सी-वर्ल्ड प्रकल्पावर स्पष्ट भूमिका

कोल्हापूरमध्ये शक्तिपीठ महामार्गाला होत असलेल्या विरोधाबाबत बोलताना, शेतकऱ्यांचे म्हणणे व मार्ग बदलाची मागणी समजून घेण्यासाठी प्रशासनाने 1 वेळा नव्हे तर 100 वेळा बसून चर्चा करावी, असे राणे म्हणाले. तसेच, सिंधुदुर्गातील सी-वर्ल्ड (Sea World) प्रकल्प हे नारायण राणे यांचे स्वप्न असले तरी जोपर्यंत स्थानिक लोक स्वतःहून सांगत नाहीत तोपर्यंत आम्ही तो सुरू करणार नाही. मागील लोकप्रतिनिधींनी 100 दिवसांत सी-वर्ल्ड रद्द करण्याचे आणि 100 दिवसांत ताळंबा धरणाच्या सातबाऱ्यावरील नोंदी कमी करण्याचे आश्वासन देऊन तब्बल 10 वर्षे जनतेची फसवणूक केली; आजही ना सी-वर्ल्डचे नोटिफिकेशन रद्द झाले आहे, ना ताळंब्याच्या सातबाऱ्यावरील नोंदी कमी झाल्या आहेत, असा घणाघातही नितेश राणे यांनी केला.

————————————————————-

हेही वाचा…

———————————————————————————-

हेही वाचा…

पालकत्व आणि पालकमंत्री यातील फरक समजून घ्या: सुनेत्रा वहिनी मोठ्या भावाच्या पत्नी; भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर आमदार रोहित पवार यांनी केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) महिला आघाडीने पुणे व मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला असतानाच, खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी (27 नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत अत्यंत समंजस भूमिका घेत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.