![]()
मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शरद पवारांची प्रकृती उत्तम असून, पुढील एक-दोन दिवसांत त्यांना डिस्चार्ज मिळेल, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. रुग्णालयात दाखल असतानाही पवार साहेबांनी राज्यातील दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या
.
रोहित पवार म्हणाले, काही वेळापूर्वी मी ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलला आलो, पवार साहेबांना तिथे भेटलो. मी त्यांना त्यांची तब्येत विचारली, त्यावर त्यांनी ‘उत्तम’ असे उत्तर दिले. काकींशी बोलल्यानंतर म्हणजे आजीसोबत बोलल्यानंतर मला त्यांनी सांगितले की पुढील एक-दोन दिवसांत त्यांना डिस्चार्ज भेटेल. पवार साहेबांना मी बोलल्यानंतर लगेच त्यांनी मला महाराष्ट्रातील दुष्काळ परिस्थितीची विचारणा केली आणि त्यावरच आम्ही बराच वेळ चर्चा केली. माणूस मोठा असावा तर असा, की आरोग्याची अडचण असताना सुद्धा, हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असताना सुद्धा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय अडचणी आहेत त्या विचारल्या, असे रोहित पवार यांनी सांगितले.
डिलिमिटेशन बिलाचा मसुदा अजून आलेला नाही
शरद पवारांचा पक्ष महायुतीमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत आणि सुप्रिया सुळे यांच्या बॉडी लॅंगवेजवरून तससे दिसून येत आहे, असा प्रश्न विचारला असता रोहित पवार म्हणाले, राजकारणात बॉडी लॅंगवेज, अंदाज, लोकांमध्ये असणारी चर्चा, यावर सगळी धोरणे केली जातात असे मला वाटत नाही. तसेच डिलिमिटेशन संदर्भात बोलताना रोहित पवार म्हणाले, केंद्र सरकारची आज बैठक झाली त्यात महिलांसाठी 50 टक्के आरक्षण देणार असल्याची चर्चा झाली, मात्र त्याचा मसुदा अजूनपर्यंत आलेला नाही. इंडिया आघाडीची भूमिका अद्याप स्पष्ट नाही.
मतदारसंघ आपल्या म्हणण्यानुसार फोडणे हे घातक
इंडिया आघाडीच्या बैठकीला आमच्या पक्षातून कोण जाणार, जाणार आहे की नाही जाणार, हे अद्याप मला माहीत नाही. पण गेल्या तर खासदार म्हणून सुप्रिया सुळे तिथे जातील. आणि बिलाचा मसुदा अजून न आल्याने त्यावर मला फारसे काही सांगता येणार नाही. शेवटी काय मांडले जाणार, कसे आणले जाणार आहे हे बिल हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. मतदारसंघ आपल्या म्हणण्यानुसार फोडणे हे घातक आहे. जे कोल्हापूरमध्ये गोकुळच्या संदर्भात झाले ते काही योग्य नाही. त्यामुळे सुप्रिया सुळे या संदर्भात स्पष्ट भूमिका घेतील, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
सुनेत्रा पवार नक्कीच स्वतःची वेगळी जागा निर्माण करतील
सुनेत्रा पवार यांच्यासंदर्भात विधानावरून रोहित पवारांवर महायुतीच्या नेत्यांकडून टीका केली जात आहे. त्यावर पुन्हा बोलताना रोहित पवार म्हणाले, सुनेत्रा काकींच्याबाबतीत बोलत असताना जे काही मी बोललो आणि त्यांना वाईट वाटले असेल तर त्यासाठी मी कालच दिलगिरी व्यक्त केली आहे. अजितदादा जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा त्यांचा वाचक प्रशासनावर होता, असे माझे मत आहे. आणि त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. पण एखादा व्यक्ती नक्कीच स्वतःची जागा निर्माण करू शकतात आणि सुनेत्रा काकी नक्कीच स्वतःची वेगळी जागा राजकारणात निर्माण करतील. मुद्दा हा होता की पुण्यातील जी परिस्थिती जी झाली आहे, त्यावरचा मुद्दा आहे. गुंडांचा त्रास हा सामान्य लोकांना होत असतो. तिथे असणारे सीपी हे भाजपचे सोडून ते कोणाचेच ऐकत नाही, हे लोकांनाही माहीत आहे. जर पालकमंत्र्यांना ताकद द्यायची असेल तर तिथल्या अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांचे ऐकले पाहिजे, असे मत रोहित पवारांनी व्यक्त केले आहे.