![]()
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील सुमारे 14 कोटी रुपयांच्या फर्निचर खरेदी आणि उभारणीच्या कामात गैरव्यवहाराचा संशय असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य विद्या रमेश गायकवाड यांनी केला. शुक्रवारी पत्रकार परिषदेत त्यांनी निविदा प्र
.
गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार, कोणता ठेकेदार पात्र ठरणार आणि कोणाचा दर सर्वात कमी असेल, हे स्पष्ट होण्यापूर्वीच आर्थिक लिफाफ्याची रक्कम 13.88 कोटी रुपये निश्चित झाली. विशिष्ट ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून निविदेच्या अटी तयार केल्या का आणि ठेकेदारांमध्ये संगनमत करून निविदा काढली जात आहे का, असा सवाल त्यांनी केला.
कार्यकारी अभियंत्यांसोबत एका नामांकित खासगी कंत्राटदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात जाऊन जिल्हा परिषदेच्या तांत्रिक मान्यतेच्या फाईलचा पाठपुरावा केल्याची माहिती समोर आल्याचे गायकवाड यांनी सांगितले. शासकीय गोपनीय कागदपत्रे खासगी कंत्राटदारापर्यंत कशी पोहोचली, याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
पीडब्ल्यूडी अधीक्षक अभियंता कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज पुसले जाण्यापूर्वी ताब्यात घेऊन सुरक्षित ठेवावे, असेही त्यांनी म्हटले. तसेच कार्यालयातील प्रवेश नोंदवही, अभ्यागत नोंदवही आणि फाईल मूव्हमेंट रजिस्टर तपासण्याची मागणी केली.
गायकवाड यांनी सांगितले की, सर्वसाधारण सभेत मांडलेल्या फर्निचर कामाच्या ठरावावर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 मधील कलम 111 (6) नुसार मतदान झाले नव्हते. ठराव मंजूर झाल्याची अधिकृत घोषणाही सभेत झाली नव्हती. तरीही ठराव मंजूर झाल्याचे गृहीत धरून पुढील प्रशासकीय कार्यवाही का सुरू आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
या ठरावाची कायदेशीर वैधता तपासून तो रद्द करण्याची मागणी गायकवाड यांनी विभागीय आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे. कामात अनियमितता किंवा संगनमत आढळल्यास दोषींवर फौजदारी कारवाई करावी, अशीही त्यांची मागणी आहे.
प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास ठराव आणि निविदा प्रक्रियेला न्यायालयात आव्हान देऊन स्थगिती मिळवण्यासाठी कायदेशीर लढा देणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.