Headlines

पत्रकारितेत लोकहित आणि दुर्बल घटकांप्रती संवेदनशीलता हवी: अनुराधा सेनगुप्ता यांचे प्रतिपादन; सत्ताधाऱ्यांकडे प्रश्न विचारण्याच्या दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन



पत्रकारांनी लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे आणि समाजातील दुर्बल घटकांप्रती संवेदनशील राहावे. ज्यांचा आवाज समाजापर्यंत पोहोचत नाही, त्यांचे प्रश्न मांडावेत. सत्ताधाऱ्यांकडे चिकित्सक नजरेने पाहून प्रश्न विचारावेत, असे ज्येष्ठ पत्रकार, दूरचित्रवाणी

.

सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ (एसआययू) आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी) यांच्या संयुक्त विद्यमाने सेनापती बापट रस्त्यावरील सिंबायोसिस विश्वभवन सभागृहात दहावे दिलीप पाडगावकर स्मृती व्याख्यान झाले. त्यावेळी सेनगुप्ता बोलत होत्या.

सिंबायोसिसचे संस्थापक आणि अध्यक्ष प्रा. डॉ. शां. ब. मुजुमदार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. लतिका पाडगावकर, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. आर. रमण, पुणे इंटरनॅशनल सेंटरचे महासचिव, खजिनदार आणि विश्वस्त प्रशांत गिरबने तसेच डॉ. रुची खेर जग्गी उपस्थित होते. डॉ. जग्गी या सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या माध्यम व संज्ञापन विद्याशाखेच्या अधिष्ठाता आहेत.

‘पत्रकार कोण? डिजिटल युगातील पत्रकारितेची भूमिका’ या विषयावर बोलताना सेनगुप्ता म्हणाल्या की, स्मार्टफोन, स्वस्त इंटरनेट आणि समाजमाध्यमांमुळे प्रत्येकाला माहिती प्रसारित करण्याची आणि थेट प्रक्षेपण करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये पत्रकार होण्याची क्षमता आहे.

“देशातील शेवटच्या नागरिकाच्या गरजा आणि समस्या समजून घेऊन त्या मांडण्यासाठी आजच्या तुलनेत अधिक पत्रकारांची गरज आहे,” असे त्या म्हणाल्या.

प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन केलेले वार्तांकन हा पत्रकारितेचा पाया आहे. मात्र, पारंपरिक वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांनी बातम्या गोळा करणाऱ्या पत्रकारांची संख्या आणि त्यासाठीची आर्थिक तरतूद कमी केली आहे, असेही सेनगुप्ता यांनी सांगितले.

रील्स, समाजमाध्यमांवरील पोस्ट आणि छायाचित्रे ही पत्रकारितेची पहिली पायरी आहे, असे त्या म्हणाल्या. मिळालेल्या माहितीची सत्यता तपासणे, संशोधन करणे, योग्य संदर्भ देणे, तज्ज्ञांची मते जाणून घेणे आणि घटनांमधील परस्परसंबंध उलगडणे यातून पत्रकारितेला मूल्य मिळते.

कमीत कमी वेळेत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्याची आणि प्रभाव पाडण्याची धडपड ही पत्रकारांसमोरील समस्या बनली आहे. त्याचे पत्रकारितेवर गंभीर परिणाम होत आहेत, असे सेनगुप्ता यांनी सांगितले.

डॉ. मुजुमदार म्हणाले की, दिलीप पाडगावकर यांचा वैचारिक वारसा आणि पत्रकारितेतील योगदान नव्या पिढीला समजणे आवश्यक आहे. आज स्मार्टफोन हेच वृत्तपत्र बनले आहे. त्यामुळे मुद्रित आणि डिजिटल माध्यमांतील पत्रकारिता, दोन्ही महत्त्वाच्या आहेत.

पूर्वी देशभक्तीने प्रेरित व्यक्ती स्वतःची वृत्तपत्रे सुरू करत. त्यातून त्या समाजात जनजागृती करत आणि सामाजिक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत, असे डॉ. मुजुमदार यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *