परिसीमन विधेयक आणि इंडिया आघाडीच्या बैठकीवरून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि त्यांच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली आहे. “शरद पवार गटाचा सत्ताधारी पक्ष
.
सुप्रिया सुळेंवर थेट निशाणा
विजय वडेट्टीवार म्हणाले की, मी सुप्रिया सुळे यांचा प्रवास पाहिला आहे. त्या भाजपच्या विमानात फिरल्या किंवा पंतप्रधानांना चार-पाच वेळा भेटल्या, तरी आम्ही चिडलो नाही. मला त्याचवेळी समजले होते की सुप्रिया सुळेंना आता सत्तेत जायचे आहे आणि मंत्री व्हायचे आहे. या लोकांना कोणताही विचार राहिलेला नाही; हे केवळ सत्तेसाठीच जन्माला आले आहेत. हा निर्णय शरद पवारांचा की सुप्रिया सुळेंचा, असे विचारले असता, “आजही दोघे बाप-लेक मिळूनच निर्णय घेतात,” असे त्यांनी सांगितले.

रोहित पवारांचे काँग्रेसमध्ये स्वागत
या सर्व घडामोडींमध्ये आमदार रोहित पवार वेगळी भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी वेगळी भूमिका घेतल्यास काँग्रेस त्यांचे स्वागत करेल का, या प्रश्नावर वडेट्टीवार म्हणाले की, “जो कोणी शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांचा पुरोगामी विचार घेऊन पुढे जाईल, त्यांच्यासोबत आम्ही राहू. रोहित पवारांचे पक्षात १०० टक्के स्वागत होईल. या संदर्भात अंतिम निर्णय हायकमांड घेत असते; हायकमांडने त्यांना पक्षात घेण्याचा निर्णय घेतल्यास राज्य युनिटचा त्याला कोणताही विरोध असण्याचे कारण नाही.
राज्यसभेच्या जागेवरून ‘इमोशनल ब्लॅकमेल’चा उल्लेख
काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांचे ३६ आमदारांचे संख्याबळ असताना केवळ १० आमदार असलेल्या शरद पवार गटाला राज्यसभेची जागा देणे ही चूक होती का, असे पत्रकारांनी विचारले. त्यावर वडेट्टीवार म्हणाले, “राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर शरद पवारांनी भाजपविरोधात प्रचंड आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे ते आमच्यासोबत आहेत, असा विश्वास वाटणे स्वाभाविक होते. तसेच, ८५ वर्षे वय झालेल्या ज्येष्ठ नेत्याला शेवटच्या टप्प्यात ही संधी दिलीच पाहिजे, असे म्हणत थोडासा ‘इमोशनल ब्लॅकमेल’ करण्याचाही प्रयत्न झाला. त्यानंतर राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.”
इंडिया आघाडी आणि २०२९ बाबत भाष्य
इंडिया आघाडीतील काही घटक पक्ष दूर जात असल्याच्या प्रश्नावर बोलताना वडेट्टीवार यांनी आरोप केला की, “हे सर्व सत्तेसाठी, लोभासाठी आणि पैशासाठी जोडले जात आहेत. आज कोणी कुठेही गेले, तरी २०२९ मध्ये जनतेचा उद्रेक ठरलेला आहे. देशात अराजकता निर्माण झाली तर जनता यांना माफ करणार नाही आणि त्यांचाच ‘गिन-गिन के बदला’ हा संवाद जनता त्यांच्यावरच उलटवेल.” तसेच, आजच्या बैठकीला शरद पवार गट अनुपस्थित राहण्याची चर्चा असल्याने ते सत्तेसोबत जाणार असल्याचे स्पष्ट होत असल्याचेही वडेट्टीवार यांनी नमूद केले.
—————–
हेही वाचा..
दावा- शरद पवारांची राष्ट्रवादी परिसीमन विधेयकाला पाठिंबा देणार: सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री होण्याची चर्चा; काँग्रेस म्हणाली- शरद पवारांना आम्ही राज्यसभेवर पाठवले

शरद पवारांचा पक्ष NCP (SP) परिसीमन विधेयकावर केंद्र सरकारला पाठिंबा देणार आहे. पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याला दुजोरा दिला आहे. शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.दरम्यान, एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, पाठिंब्याच्या बदल्यात NCP (SP)च्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्री करण्यात येणार आहे. याशिवाय पक्षाने राज्य सरकारमध्ये एक कॅबिनेट मंत्रीपद आणि दोन राज्यमंत्रिपदेही मागितली आहेत. महाराष्ट्र विधानसभेत पक्षाचे 10 आमदार आणि लोकसभेत 8 खासदार आहेत. संसदेचे विशेष अधिवेशन 30 नोव्हेंबरपासून लोकसभेत आणि 2 डिसेंबरपासून राज्यसभेत सुरू होणार आहे. सविस्तर वाचा