![]()
डिलिमिटेशन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवारांची ही भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पटलेली नाही, असे सांगत शेट्टी यांनी खंत व्यक्
.
राजू शेट्टी म्हणाले, माझ्यासारख्याने त्यांना सल्ला द्यावा अशी परिस्थिती नाही, पण हा निर्णय स्वतः त्यांनी घेतला आहे की त्यांच्या प्रकृतीचा फायदा इतर कोणी घेतला आहे, हे मला माहीत नाही. तो निर्णय पक्षातल्या अनेकांना रुजलेला नाही. त्यांचे स्वतःचे आठ खासदार जर तिकडे जायला लागले तर हे चुकीचे आहे. तसेच कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जो आरोप केला आहे तो शरद पवारांचा इतिहास आहेच, असे म्हणत शेट्टी यांनी खोचक टीका केली आहे.
वडेट्टीवारांनी केलेले आरोप शरद पवारांचा इतिहास
विजय वडेट्टीवार यांच्या आरोपाळा दुजोरा देत राजू शेट्टी म्हणाले, विजय वडेट्टीवार यांनी जो आरोप केला आहे तो शरद पवारांचा इतिहास आहेच. दादांच्या बाबतीत तो अनुभव होताच. जुना इतिहास उगाळण्यात फारसे स्वारस्य नाही. मात्र हा घेतलेला निर्णय मला पटलेला नाही. राष्ट्रवादीमध्ये दोन मतप्रवाह झालेले आहेतच. त्यांच्या पक्षातील अनेकांना हा निर्णय पटलेला नाही. भविष्यात त्याचे पडसाद उमटतीलच, असेही शेट्टी यांनी म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर भाष्य करताना राजू शेट्टी म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाची भूमिका मांडताना वैचारिक तडजोड केलेली दिसते आहे. हे मला अजिबात पटलेले नाही. डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून संपूर्ण देशातील विरोधी पक्ष एकवटलेला आहे. मोदी-शाह यांनी कटकारस्थान करून करून पक्ष फोडले, गलिच्छ राजकारण त्यांनी केले. मतदारसंघ विधेयक मंजुरीसाठीचे बिल ते पास करून घेतील. मात्र जनतेच्या मनातील ते बिल पास होईल का? सर्वसामान्य लोकांची त्यांना मान्यता मिळेल का? असा सवाल शेट्टी यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला आहे.
तसेच लोकसभेच्या खासदारांची संख्या वाढवून 2029 ला सत्ता काबिज करायचे हे तुमचे स्वप्न दिवसाचे स्वप्न ठरणार आहे. ही वाढलेली संख्या तुमच्या उरावर बसणार आहे, असा इशारा देखील राजू शेट्टी यांनी दिला आहे.