Headlines

सत्ता हवी होती तेव्हा ‘सिल्वर ओक’वर पाया पडायला रांगा लावल्या: आता शरद पवार खंजीर खुपसणारे झाले का? एनडीएत आम्ही नंबर 2 चा पक्ष, संजय शिरसाटांचा पलटवार – Sanjay Shirsat Slams Sharad Pawar Over Mahavikas Aghadi Politics


संसदेच्या विशेष अधिवेशनात येऊ घातलेल्या डिलिमिटेशन विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याने महाविकास आघाडीत सुरू झालेल्या वादावर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी (28 नोव्हेंबर) छत्रपती संभाजीन

.

“शरद पवार यांनी सध्या तरी उद्धव ठाकरेंना एकटे सोडले असून ते महाविकास आघाडीसोबत नाहीत हे स्पष्ट दिसत आहे. मात्र, कालपर्यंत ज्या काँग्रेसने 2019 मध्ये शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून 2.5 वर्षे मंत्रिपदे भोगली आणि मार्च 2026 मध्ये त्यांना राज्यसभेवर पाठवले, त्याच काँग्रेसला आज शरद पवार पाठीत खंजीर खुपसणारे वाटू लागले आहेत. सत्तेसाठी ‘सिल्वर ओक’वर जाऊन पाया पडणाऱ्यांची रांग लावायची आणि सत्ता गेल्यावर खंजीर खुपसणारे म्हणायचे, हा काँग्रेसचा दुटप्पीपणा उद्या उद्धव ठाकरे गटाच्याही वाट्याला येणार आहे,” असा सणसणीत टोला शिरसाट यांनी लगावला. तसेच, राजकारणात अंदाज लावायला कोणतीही फी लागत नाही, असे म्हणत त्यांनी 8 आमदारांच्या जोरावर मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहणाऱ्यांच्या चर्चांचीही खिल्ली उडवली.

2019 मध्ये सत्तेसाठी सिल्वर ओकवर रांगा लावल्या

डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेत्यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या ‘पाठीत खंजीर खुपसण्याच्या’ टीकेचा संजय शिरसाट यांनी खरपूस समाचार घेतला. मार्च 2026 मध्ये शरद पवार यांना राज्यसभेवर जायचे होते, तेव्हा काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता; मात्र आज पवारांची भूमिका त्यांना दुर्दैवी आणि खंजीर खुपसणारी वाटत आहे. जर शरद पवारांचा इतिहास खंजीर खुपसण्याचा होता, तर 2019 मध्ये सत्ता स्थापन करताना तुम्हाला भान नव्हते का की आपण खंजीर खुपसणाऱ्यांसोबत सत्तेत बसत आहोत आणि 2.5 वर्षे मंत्री म्हणून मिरवत आहोत?

काँग्रेसची दुटप्पी भूमिका उघड

जेव्हा सत्ता हवी असते तेव्हा सर्वजण ‘सिल्वर ओक’च्या दिशेने जाऊन शरद पवार यांच्या पाया पडण्यासाठी रांगा लावतात; आणि जेव्हा ते तुमच्या मताशी सहमत नसतात किंवा तुमची सत्ता जाते, तेव्हा ते खंजीर खुपसणारे दिसतात. काँग्रेसने आज शरद पवारांबाबत जी दुटप्पी भूमिका घेतली आहे, तीच भूमिका उद्या ते उद्धव ठाकरे गटाबाबतही घेतील, असा इशारा शिरसाट यांनी दिला.

कलम 370 प्रमाणेच उद्धव ठाकरेंच्या भूमिकेत गोंधळ

या घडामोडींमुळे उद्धव ठाकरे गटाची झालेली कोंडी अधोरेखित करताना संजय शिरसाट यांनी त्यांना डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याचा सल्ला दिला. उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेत नेहमीच गोंधळ (कन्फ्युजन) असतो. काश्मीरमधील कलम 370 हटवण्याच्या वेळीही त्यांनी आधी माघार घेतली आणि नंतर पाठिंबा दिला. मला वाटते की, उद्धव ठाकरे यांनी डिलिमिटेशन विधेयकालाही पाठिंबा दिला पाहिजे. मात्र, केवळ शरद पवार यांच्या भूमिकेला आणि एनडीएला (NDA) जाणूनबुजून विरोध करण्याच्या नादात उद्धव ठाकरे आज पूर्णपणे एकाकी पडत चालले आहेत. येत्या 1 ते 2 दिवसांत सर्व प्रक्रिया पूर्ण होईल आणि विधेयकावरील मतदानावेळी टीका करणाऱ्यांची नेमकी भूमिका काय आहे, हे संपूर्ण देशासमोर येईल.

खासदारांच्या संख्येनुसार एनडीएत शिवसेना नंबर 2 चा पक्ष

शरद पवार गट सत्तेत सहभागी झाल्यास शिवसेनेचे महत्त्व कमी होईल, या विरोधकांच्या टीकेला संजय शिरसाट यांनी सडेतोड उत्तर दिले. शरद पवार गट सोबत आल्यास शिवसेनेचे मूल्य कमी होईल, याची चिंता विरोधकांनी करण्याची अजिबात गरज नाही. आम्हाला काय करायचे हे ठरवणारे तुम्ही कोण? आज देशातील अनेक पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे घटक बनले आहेत. खासदारांच्या संख्येचा विचार केल्यास, भाजपनंतर शिवसेना हा एनडीएतील 2 रा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे आमची काळजी करण्यासाठी पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत. आमची चिंता करण्यापेक्षा महाविकास आघाडीत पडलेली दुफळी आणि फाटाफूट सांभाळा; विधेयकाच्या मतदानावेळी तुमची ही फूट उघड झाल्याशिवाय राहणार नाही.

राजकारणात अंदाज लावायला फी लागत नाही

सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांवर भाष्य करताना संजय शिरसाट यांनी मिश्किल टिप्पणी केली. राजकारणामध्ये अंदाज (गेस) लावायला कोठेही फी लागत नाही आणि कोणी काय बोलावे यावर कोणताही अलिखित नियम नाही. त्यामुळे 8 आमदारांच्या बळावर कोणी खासदार मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहतात, तर कोणी थेट पंतप्रधान किंवा राष्ट्रपतीपदाचीही चर्चा करतील; पण अशा बोलण्याला काहीही अर्थ नसतो. सत्तेतील सर्व महत्त्वाचे निर्णय हे वरिष्ठ नेते एकत्र बसूनच घेत असतात, असेही संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.

—————————————————————–

हेही वाचा…

860 खासदार आणून लोकशाही संपवण्याचा डाव: 150 कोटींचा ‘नॅशनल हॉर्स ट्रेडिंग स्टॉक एक्सचेंज’ उघडलाय; डिलिमिटेशनवरून संजय राऊतांचा हल्लाबोल

केंद्र सरकारने आणलेल्या डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (28 नोव्हेंबर) आयोजित पत्रकार परिषदेत भाजप, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि या विधेयकाला पाठिंबा देण्याच्या तयारीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) नेत्यांवर अत्यंत तिखट शब्दांत हल्लाबोल केला आहे. “देशातील 543 खासदारांच्या जागी 860 खासदार आणायचे आणि आपल्या मर्जीप्रमाणे मतदारसंघांची पुनर्रचना करून कायमस्वरूपी सत्ता ताब्यात ठेवायची, हा भाजपचा लोकशाही खतम करण्याचा कट आहे. या विधेयकासाठी अमित शहांनी ‘नॅशनल हॉर्स ट्रेडिंग स्टॉक एक्सचेंज’ उघडला असून तिथे प्रत्येक खासदाराला 150 कोटींचा भाव दिला जात आहे,” असा खळबळजनक आरोप राऊत यांनी केला. तसेच, शरद पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोणताही निर्णय घेण्याच्या स्थितीत नसताना त्यांच्या सहकाऱ्यांनी सत्तेच्या भुकेपोटी त्यांच्या 60 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीची माती केली असून, यापुढे त्यांना फुले-शाहू-आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेण्याचा कोणताही अधिकार उरलेला नाही, असा घणाघातही त्यांनी केला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.