Headlines

हिंगोलीच्या वैद्यकीय क्षेत्रात मानाचा तुरा: लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटलला प्रतिष्ठित ‘एनएबीएच’ मानांकन, अत्याधुनिक सुविधांमुळे स्थानिक रुग्णांना दिलासा


शहरातील नारायण नगर येथील ‘लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटल’ने वैद्यकीय सेवेत एक नवा मैलाचा दगड गाठला असून, रुग्णालयाला भारत सरकारच्या ‘क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया’ अंतर्गत येणाऱ्या ‘नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स’ (NABH)

.

​या रुग्णालयात सर्वसामान्य व गंभीर रुग्णांसाठी सर्व प्रकारच्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विशेषतः, या ठिकाणी हृदयविकाराच्या रुग्णांसाठी अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाली आहे. यापूर्वी हिंगोली जिल्ह्यातील हृदय रुग्णांना तातडीच्या उपचारांसाठी नांदेड किंवा छत्रपती संभाजीनगर येथे धाव घ्यावी लागत होती. मात्र, आता ही सुविधा हिंगोलीतच उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांचा महत्त्वाचा वेळ वाचत असून, त्यांच्यासह नातेवाईकांचा होणारा मोठा आर्थिक व मानसिक त्रास कमी झाला आहे.

​रुग्णालयाच्या या यशात येथील अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमचे मोठे योगदान आहे. यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर डॉ. अखिल अग्रवाल, डॉ. मयूर अग्रवाल, डॉ. प्राची अग्रवाल, डॉ. विजया अग्रवाल यांच्यासह त्यांच्या संपूर्ण वैद्यकीय पथकाचे अहोरात्र प्रयत्न व रुग्णसेवेप्रती असलेली समर्पित भावना मोलाची ठरली आहे.

रुग्णांना वेळेवर आणि अचूक उपचार मिळावेत, यासाठी हे पथक सदैव तत्पर असते. ​दरम्यान, ‘एनएबीएच’चे हे प्रमाणपत्र ऑक्टोबर २०२६ ते ऑक्टोबर २०२८ या कालावधीसाठी वैध असून, डॉ. पराग आर. रिंदानी यांच्या स्वाक्षरीने हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. हिंगोलीसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावरील मानके पूर्ण करणारे रुग्णालय उभे राहिल्याने सर्वसामान्य नागरिक व रुग्णांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

——-

हेही वाचा..

हिंगोलीच्या औद्योगिक विकासाला नवी गती:एक हजार 235 कोटींचे गुंतवणूक करार; वारंगा व कामठा येथे एमआयडीसीला मंजुरी

हिंगोली येथे जिल्हास्तरीय गुंतवणुक परिषदेत शुक्रवारी (ता. 27) उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत 101 उद्योजकासोबत 1235 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले आहेत. त्यातून सात हजार स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. या शिवाय कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा,कामठा येथे एमआयडीसीला मंजूरी देण्यात आली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.