Headlines

विधेयकाला पाठिंबा आणि एनडीएत प्रवेश या दोन वेगळ्या गोष्टी: शरद पवार व सुप्रिया सुळेंचे अधिकृत पत्र येऊ द्या, मगच मंत्रिपदावर बोलू; प्रफुल्ल पटेल यांची रोखठोक भूमिका – Prafulla Patel Statement on Sharad Pawar NDA Entry


संसदेच्या विशेष अधिवेशनात येऊ घातलेल्या महिला आरक्षण व डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांवरून सुरू असलेल्या राजकीय गदारोळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार प

.

“विधेयकाला पाठिंबा देणे हे देशहिताचे काम आहे, त्यात कोणतेही राजकारण नाही; मात्र एनडीएत (NDA) सामील होण्यासाठी अधिकृत पत्र द्यावे लागते. जसे अजित पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष व विधिमंडळ नेते म्हणून पत्र दिले आणि मी दिल्लीत संसदेत पत्र दिले, तसे ज्या दिवशी शरद पवार किंवा सुप्रिया सुळे एनडीएत सामील होण्याचे अधिकृत पत्र देतील, त्यानंतरच 2 मंत्रिपदांच्या किंवा इतर चर्चांवर बोलता येईल,” असे पटेल यांनी स्पष्ट केले. तसेच, “शरद पवार हे माझे नेते कालही होते, आजही आहेत आणि नेहमीच राहतील; मी त्यांना अनेकदा एनडीएची भूमिका घेण्याची सूचना केली होती,” असा मोठा खुलासाही प्रफुल्ल पटेल यांनी केला.

दर 15 वर्षांनी डिलिमिटेशन होतेच, यात आश्चर्य नाही

डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला होत असलेल्या विरोधाचा समाचार घेताना प्रफुल्ल पटेल यांनी स्वतःच्या मतदारसंघाचा अनुभव सांगितला. डिलिमिटेशन ही काही नवीन किंवा आश्चर्यकारक गोष्ट नसून दर 15 वर्षांनी मतदारसंघांची पुनर्रचना होत आली आहे. मी स्वतः गोंदिया-भंडारा मतदारसंघाचा खासदार असताना माझ्या मतदारसंघाच्या सीमा नव्याने आखल्या गेल्या होत्या आणि त्या नवीन सीमांनुसार पुन्हा निवडणूक पार पडली. वाढत्या शहरीकरणानुसार प्रत्येक नागरिकाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, या चांगल्या भावनेतून हे विधेयक आणले गेले आहे.

पंतप्रधान मोदींनी हिमतीने निर्णय घेतला

महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याच्या केवळ गप्पा आजवर झाल्या होत्या; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे हिमतीने करून दाखवले आणि आता ते प्रत्यक्षात उतरत आहे. या देशहिताच्या व महिला हिताच्या विधेयकाला शरद पवार यांचा पक्ष आणि डीएमके (DMK) पाठिंबा देत असतील, तर आम्ही त्याचे मनापासून स्वागतच करतो.

राष्ट्रवादी स्थापनेवेळीही ‘खंजीर खुपसला’ अशीच टीका होती!

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या ‘पाठीत खंजीर खुपसण्याच्या’ टीकेवर प्रफुल्ल पटेल यांनी इतिहासाची आठवण करून दिली. 1999 मध्ये सोनिया गांधी यांच्या मुद्द्यावरून आम्ही काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली, तेव्हाही काँग्रेसने संधीसाधू आणि पाठीत खंजीर खुपसला अशीच टीका केली होती. राजकारणात योग्य वेळी योग्य भूमिका घेतल्यावर काही लोकांना चांगले वाटते, तर काहीजण टीका करतात. कोणतेही चांगले काम करायला निघाले तर 5 प्रशंसक असतात, 2 टीका करणारे असतात आणि 3 तटस्थ असतात. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत आहे आणि जनतेचा कौल त्यांच्या बाजूने आहे.

शरद पवार आजारी पडल्यावर रुग्णालयात भेटणारा मी पहिला व्यक्ती

काही दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची रुग्णालयात घेतलेली भेट आणि त्यानंतर बदललेल्या राजकीय समीकरणावर पटेल यांनी मनमोकळे भाष्य केले. राजकीय भूमिका थोडी इकडे-तिकडे झाली असली तरी शरद पवार हे माझे नेते कालही होते, आजही आहेत आणि नेहमीच राहतील; त्यांच्याप्रती माझी श्रद्धा, निष्ठा आणि आस्था कायम आहे. त्यांची प्रकृती बरी नसल्याचे समजल्यावर रुग्णालयात जाऊन त्यांना भेटणारा मी स्वाभाविकपणे पहिला व्यक्ती होतो. त्या भेटीत आमच्यात काही राजकीय चर्चा झाली असेल तर कोणी त्याचा वेगळा अर्थ काढू नये, आम्हाला त्याने काही फरक पडत नाही.

मोदी आणि फडणवीस चांगले काम करतायत

“पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात चांगले काम करत आहेत; त्यामुळे आपणही एनडीएची भूमिका घ्यावी आणि एनडीएत सोबत राहावे,” अशी सूचना मी यापूर्वीच पवार साहेबांना अनेकदा केली होती. आता त्या दिशेने त्यांची पावले पडत असतील तर त्याचे स्वागतच केले पाहिजे.

आधी चिट्ठी येऊ द्या, मग बोलू

शरद पवार गटाला एनडीएमध्ये 2 मंत्रिपदे मिळणार का या प्रश्नावर बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी तूर्तास सावध पवित्रा घेतला. विधेयकाला पाठिंबा देणे आणि एनडीएत सामील होणे या दोन स्वतंत्र बाबी आहेत. आजच मी बातमीत वाचले की ‘इंडिया’ (INDIA) आघाडीच्या बैठकीला शरद पवार गटाचे प्रतिनिधी म्हणून खासदार नीलेश लंके उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे जोपर्यंत शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्याकडून एनडीएत सामील होण्याची अधिकृत चिट्ठी येत नाही, तोपर्यंत मंत्रिपदांच्या चर्चेवर बोलणे उचित ठरणार नाही; चिट्ठी आल्यानंतर तुम्ही मला यावर नक्की प्रश्न विचारू शकता, असेही प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.

————————————————-

हेही वाचा..

शरद पवारांची भूमिका पटलेली नाही: मित्रपक्षांना तरी विश्वासात घ्यायला हवे होते, राजू शेट्टींचे डिलिमिटेशनसंदर्भात भाष्य

डिलिमिटेशन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवारांची ही भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पटलेली नाही, असे सांगत शेट्टी यांनी खंत व्यक्त केली की, पुरेसे संख्याबळ नसतानाही केवळ त्यांच्या ज्येष्ठत्वाला मान देऊन ठाकरे यांच्या शिवसेनेसह मित्रपक्षांनी त्यांना राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी पाठिंबा दिला होता. त्यामुळे असा महत्त्वाचा निर्णय घेताना त्यांनी किमान मित्रपक्षांना तरी विश्वासात घ्यायला हवे होते, असे शेट्टी यांनी म्हटले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.