Headlines

डिलिमिटेशनला माझा पाठिंबा: मात्र प्रक्रिया सर्वसंमतीने व्हायला हवी- सुशीलकुमार शिंदे


डिलिमिटेशन विधेयकावरून देशभरात आणि राज्यात सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. काँग्रेस पक्षाने या विधेयकाला विरोध केला असला, तरी वाढत्या लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्व मि

.

डिलिमिटेशन आणि जनगणनेच्या मुद्द्यावर भाष्य

सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, काँग्रेसने डिलिमिटेशनला विरोध केला आहे. मात्र, माझे वैयक्तिक मत असे आहे की हे डिलिमिटेशन व्हायला पाहिजे. आता त्याचा वेळ खूप निघून गेला आहे. जशी लोकसंख्या वाढते, तसे प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे आणि त्यामुळे ते होणे गरजेचेच आहे.”

२०११ च्या जनगणनेऐवजी नवी जनगणना करून डिलिमिटेशन करावे, या काँग्रेसच्या भूमिकेबाबत विचारले असता शिंदे म्हणाले की, “२०११ नंतर पुन्हा एकदा खानेसुमारी करून त्याप्रमाणे डिलिमिटेशन करावे, ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. आता काळ पुढे गेलेला आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. करायचे असेल तर करावे, पण ते सर्व संमतीने झाले असते तर बरे झाले असते.”

दक्षिण भारताच्या मुद्द्यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दाखला

डिलिमिटेशनमुळे तामिळनाडू, केरळ यांसारखे दक्षिण भारतातील प्रांत वेगळे पडतील का, या प्रश्नावर शिंदे यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “त्यांच्या मनात काय आहे हे आपल्याला कळायला मार्ग नाही. परंतु, अशा प्रकारे जर विभागणी झाली, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत आणि त्यानंतरही जो विचार मांडला होता, त्यानुसार हे देशाच्या दृष्टीने धोकादायक आहे.”

ज्येष्ठ आणि तरुण नेत्यांमधील मतभेदांच्या चर्चांवर स्पष्टीकरण

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेबाबत विचारले असता, त्यांचा पक्ष वेगळा आहे आणि आमचा पक्ष वेगळा आहे, त्यामुळे त्यांच्या इच्छेविषयी मी काय बोलणार,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच, राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांच्यासारखे काँग्रेसचे तरुण नेते डिलिमिटेशनला विरोध करत असताना, ज्येष्ठ नेते मात्र त्याचे समर्थन करत असल्याने पक्षात दुफळी निर्माण झाली आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर उत्तर देताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, “प्रत्येकाचा विचार वेगळा असतो. मी दुसऱ्या पक्षाविषयी बोलत नाही; पण आमच्या पक्षाच्या दृष्टिकोनातून बोलत असून, मी माझे वैयक्तिक मत सांगितले आहे.” ————–

हेही वाचा..

देश तोडण्याचा भाजपचा कट!:सुप्रिया सुळेंच्या पक्षाने पाठिंबा दिल्यास तो मतदारांचा व संविधानाचा अपमान ठरेल; प्रणिती शिंदेंची टीका

संसदेच्या विशेष अधिवेशनात येऊ घातलेल्या डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकावरून काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी शनिवारी (28 नोव्हेंबर 2026) पत्रकार परिषद घेत भाजप सरकार आणि या विधेयकाला पाठिंबा देण्याच्या तयारीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) नेत्यांवर अत्यंत बोचऱ्या शब्दांत हल्लाबोल केला आहे. “डिलिमिटेशन हे विधेयक भाजपने देश तोडण्यासाठी आणि कायमस्वरूपी सत्तेत राहण्यासाठी रचलेले षड्यंत्र आहे. 2029 च्या निवडणुकीत आपली सत्ता 100 टक्के जाणार असल्याची भीती भाजपला वाटत असल्यानेच मतदारसंघांची तोडफोड (जेरीमँडरिंग) केली जात आहे. या विधेयकासाठी खासदारांना 150 कोटी रुपये दिले जात असल्याची चर्चा असून, 2024 मध्ये भाजपने मलाही ऑफर देण्याचा प्रयत्न केला होता; मात्र आमच्या रक्तात काँग्रेस आणि संविधान आहे,” असा घणाघात प्रणिती शिंदे यांनी केला. सविस्तर वाचा

दावा- शरद पवारांची राष्ट्रवादी परिसीमन विधेयकाला पाठिंबा देणार: सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री होण्याची चर्चा; काँग्रेस म्हणाली- शरद पवारांना आम्ही राज्यसभेवर पाठवले

शरद पवारांचा पक्ष NCP (SP) परिसीमन विधेयकावर केंद्र सरकारला पाठिंबा देणार आहे. पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याला दुजोरा दिला आहे. शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.दरम्यान, एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, पाठिंब्याच्या बदल्यात NCP (SP)च्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्री करण्यात येणार आहे. याशिवाय पक्षाने राज्य सरकारमध्ये एक कॅबिनेट मंत्रीपद आणि दोन राज्यमंत्रिपदेही मागितली आहेत. महाराष्ट्र विधानसभेत पक्षाचे 10 आमदार आणि लोकसभेत 8 खासदार आहेत. संसदेचे विशेष अधिवेशन 30 नोव्हेंबरपासून लोकसभेत आणि 2 डिसेंबरपासून राज्यसभेत सुरू होणार आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.