Headlines

नवापुरात बर्ड फ्लूचा शिरकाव:1 लाख 40 हजार पक्षी नष्ट करण्याचे 'कलिंग ऑपरेशन' सुरू




नवापूर शहरात बर्ड फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, पशुसंवर्धन विभागाने आज १ मे रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास ‘कलिंग ऑपरेशन’ (पक्षी नष्ट करण्याची मोहीम) अधिकृतपणे सुरू केली आहे. शहरालगतच्या तीन प्रमुख पोल्ट्री फार्मचे नमुने पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाचे 40 कर्मचारी 10 अधिकारी घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत कलिंग ऑपरेशन सुरू होते यात शेकडो पक्षी नष्ट करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ​सात पोल्ट्री फार्म रडारवर; १.४० लाख पक्षी मारणार ​मिळालेल्या माहितीनुसार, नवापूर परिसरातील डायमंड, तस्लीम आणि डॉन या तीन पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून बाधित क्षेत्रापासून एक किलोमीटर परिघातील सात पोल्ट्री फार्ममधील सुमारे १ लाख ४० हजार पक्षी आणि हजारो अंडी नष्ट करण्यात येणार आहेत. या पोल्ट्री फार्मचा समावेश:
* ​डायमंड पोल्ट्री फार्म
* ​न्यू डायमंड पोल्ट्री फार्म
* ​डायमंड लेयर पोल्ट्री फार्म
* ​एपसन पोल्ट्री फार्म
* ​तसलीम पोल्ट्री फार्म
* ​मुस्तबा पोल्ट्री फार्म ​मोहिमेसाठी ५० कर्मचारी तैनात ​पशुसंवर्धन विभागाचे नंदुरबार सहआयुक्त संजय खाचणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला डायमंड पोल्ट्री येथील ८ हजार पक्षी नष्ट करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे ऑपरेशन आज मध्यरात्रीपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. या मोहिमेसाठी जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाचे साधारण ५० अधिकारी आणि कर्मचारी नवापुरात दाखल झाले असून चोख बंदोबस्तात ही प्रक्रिया पार पाडली जात आहे. यादरम्यान महसूल विभागाची टीम देखील घटनास्थळी दाखल होतील. ​विलंबामुळे नाराजीचा सूर ​बर्ड फ्लूचा अहवाल प्राप्त होऊन २४ तासांपेक्षा जास्त कालावधी उलटल्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात झाली. प्रशासनाने ‘कलिंग ऑपरेशन’ सुरू करण्यास उशीर केल्याने स्थानिक स्तरावर आणि संबंधित क्षेत्रात काही प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. संसर्ग वाढू नये यासाठी ही प्रक्रिया अत्यंत वेगाने पूर्ण करण्याचे आव्हान आता प्रशासनासमोर आहे. संसर्ग रोखण्यासाठी १ किमी परिघातील क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आले असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *