Headlines

त्रिमूर्ती संस्थेचे सचिव मनिष घाडगे यांचे निधन:शोककुल वातावरणात अंत्यसंस्कार




प्रतिनिधी | नेवासे फाटा त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाचे सचिव मनीष घाडगे यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी शोककुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. संस्थेच्या प्रांगणात झालेल्या अंत्यविधीला संस्थेच्या अध्यक्षा ॲड. सुमती घाडगे, त्यांच्या दोन्ही कन्या आणि जावई अनुपस्थित होते. मनीष घाडगे यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले, मात्र दुपारपर्यंत त्यांचा अंत्यविधी कुठे होणार, याबाबत संभ्रम कायम होता. मूळ गाव तेलकुडगाव की नेवासे फाटा? यावरून नातेवाईकांमध्ये एकमत होत नसल्याने श्रध्दांजली वाहण्यासाठी येणारे अनेक मान्यवर बुचकळ्यात पडले होते. अखेर सायंकाळी ५ वाजता त्रिमूर्ती संकुलाच्या प्रांगणात पार्थिव आणण्यात आले. या अंत्यविधीला राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनीष घाडगे यांनी त्यांच्याच कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर संस्थेतील अनेक जबाबदार पदाधिकारी ‘नॉट रिचेबल’ झाले होते. अंत्यविधीलाही त्यांनी न येण्याचे धाडस केल्याने उपस्थित जनसमुदायात संताप आणि अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *