![]()
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी १२ व्या फेरीअखेर ५०,२७३ मतांची दणदणीत आघाडी घेऊन विजयाकडे भक्कम पाऊल टाकले आहे. या यशाचे कल स्पष्ट होताच कर्डिले यांनी आपली पहिली भावनिक प्रतिक्रिया दिली असून, हा विजय म्हणजे सर्वसामान्य जनतेने त्यांच्या वडिलांप्रती, म्हणजेच ‘कर्डिले साहेबां’प्रती व्यक्त केलेली कृतज्ञता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरी विधानसभेची जागा रिक्त झाली होती. राहुरी पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली. १२ व्या फेरीअखेर अक्षय कर्डिले यांनी ६१ हजार ०३५ मते मिळवली असून, प्रतिस्पर्धी उमेदवार गोविंद मोकाटे यांना केवळ १० हजार ७६२ मते मिळाली आहेत. या विशाल मताधिक्यामुळे राहुरीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी आता मोठा जल्लोष सुरू केला आहे. नेमके काय म्हणाले अक्षय कर्डिले? अक्षय कर्डिले म्हणाले, ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हातात घेतली होती. ही निवडणूक नसून, कर्डिले साहेबांच्या प्रती प्रत्येकाच्या मनातील भावना होती. ही भावना आपल्या मतातून व्यक्त केलेली आहे. अक्षय कर्डिले म्हणाले, गेल्या ३० वर्षांपासून साहेब प्रत्येकाच्या सुख-दु:खात कुटुंबातील सदस्यासारखे सहभागी व्हायचे. साहेबांनी प्रत्येकाच्या हृदयात घर तयार केले. ६ महिने झाले आज आपल्यात साहेब नाहीत. पण तेवढेच प्रेम आणि तेवढाच विश्वास जनतेने माझ्यावर दाखवला. अक्षय कर्डिले म्हणाले, येणाऱ्या काळात कर्डिले साहेबांची नाळ ज्याप्रमाणे प्रत्येकाशी जुडल्या गेलेली होती. आज प्रत्येकाने माझ्यावर तो विश्वास दाखवलाय. मला ती संधी दिलेली आहे. ज्याप्रमाणे कर्डिले साहेब सर्वांसोबत होते, त्याचपद्धतीने येणाऱ्या काळात माझा प्रयत्न राहील ७ उमेदवार रिंगणात, कर्डिलेंची सरशी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार असून, मतमोजणी सुरू आहे. राहुरी मतदारसंघात भाजपचे अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेसचे (श.प.) गोविंद मोकाटे, शिवसेना (उबाठा) पक्षाचे बंडखोर नेते रावसाहेब खेवरे, वंचितचे संतोष चोळके यांच्यासह एकुण ७ उमेदवार रिंगणात होते. या ठिकाणी 23 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. जवळपास 56.20% मतदान झाले.
Source link
राहुरी विधानसभा पोटनिवडणूक निकाल:जनतेने कर्डिले साहेबांप्रतीची भावना मतातून व्यक्त केली, अक्षय कर्डिले यांची प्रतिक्रिया