जिल्ह्यातील ३२ लाख ६६ हजार ३७५ मतदारांच्या अधिकृत नोंदणीची सत्यता पडताळण्यासाठी निवडणूक विभागाकडून काम सुरू आहे. तब्बल २४ वर्षांनंतर होणाऱ्या स्पेशल इन्टेन्सिव्ह रिव्हीजन (एसआयआर) कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, सध्या २००२ सालच्या मतदार यादीशी सध्याच्य
.
ज्यांचे नाव २००२ च्या यादीत नव्हते, अशा मतदारांच्या आई-वडिलांच्या नावाशी सध्याची नोंद जुळवली जात आहे. विवाहित मुलींचे नाव त्यांच्या पूर्वीच्या ठिकाणच्या नोंदीनुसार तपासून पाहिले जात आहे. निवडणूक आयोगाच्या ॲपद्वारे बीएलओ हे काम करत असून, आतापर्यंत २४ लाख १५ हजार ३५ मतदारांचे (७४.४४ टक्के) मॅपिंग पूर्ण झाले आहे. उर्वरित काम १० मे पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे मुस्लिम बहुल भागामध्ये मॅपिंगचे काम मोठ्या प्रमाणात झाले असल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली.
महिन्या अखेरीस एसआयआरचा मुख्य कार्यक्रम सुरू झाल्यानंतर ३,२६४ बीएलओ प्रत्येक कुटुंबाच्या घरी येतील. ते मतदारांना एक इन्युमरेशन फॉर्म देतील, ज्यावर क्युआर कोड असेल. मतदारांना या फॉर्मवर स्वतःचा फोटो लावून माहिती भरावी लागेल. त्यानंतर निवडणूक नोंदणी अधिकारी या माहितीची पडताळणी करून फॉर्म मंजूर करतील. ज्या मतदारांचे नाव मॅपिंगमध्ये किंवा यादीत आढळणार नाही, त्यांना घाबरण्याचे कारण नाही. अशा नागरिकांना तहसीलदार स्तरावर पुन:नोंदणीसाठी अर्ज करावा लागेल. यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या १६ प्रकारच्या कागदपत्रांपैकी आवश्यक पुरावे जोडावे लागतील. नागरिकांनी बीएलओना आवश्यक माहिती देऊन प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी सविता चौधर यांनी दिली.
बीएलएच्या माध्यमातून मदत
सर्व मतदार नोंदणी अधिकारी, विधानसभा मतदार नोंदणी अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि सुपरवायझर यांना हे काम निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्याना देखील बीएलए नेमण्याची विनंती केली असून त्यांची देखील मदत घेतली जात आहे. -विनय गौडा, जिल्हाधिकारी

मतदारसंघनिहाय झालेले मॅपिंग….
मॅपिंग प्रक्रियेदरम्यान तब्बल १ लाख ५ लाख मतदारांचे फोटो सारखेच असल्याचे समोर आले आहे. यामुळे या सर्व मतदारांना या यादीतून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासोबतच एकापेक्षा अधिक मतदारसंघांमध्ये नाव आणि वयामध्ये बदल करून मतदान ठेवणारेदेखील आता प्रशासनाच्या रडारवर आहेत.
या कारणांमुळे मॅपिंग झाले कमी
काही मतदार त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर आढळून न आल्याचे तसेच काही मतदार मृत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकरणांत आयोगाच्या नियमानुसार संबंधित मतदारांना ‘स्थलांतरित मतदार’ व ‘मृत मतदार’ या वर्गवारीत समाविष्ट करून नावे वगळण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. शहर आणि एमआयडीसी परिसरात स्थलांतरित मतदार असल्याने मोठ्या प्रमाणात मॅपिंग करणे बाकी आहे.