Headlines

राष्ट्रीय हॅकेथॉनमध्ये ‘कृषी इनोव्हेटर्स’ संघ विजेता:चांदवडच्या जैन अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ‘ब्लॉकव्हर्स 2026’ हॅकेथॉन उत्साहात‎




येथील एसएनजेबी संकुलातील स्व. सौ. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभागाच्या वतीने ब्लॉकव्हर्स २०२६ या १२ तासांच्या राष्ट्रीय स्तरावरील हॅकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. गुगल डेव्हलपर ग्रुप ऑन कॅम्पस, स्पेस व आर्ट्स क्लब यांच्या सहकार्याने पार पडलेल्या या स्पर्धेत कृषी इनोव्हेटर्स या संघाने प्रथम क्रमांक पटकावत १५ हजारांचे पारितोषिक मिळविले. स्पर्धेच्या पहिल्या फेरीत देशभरातून १८० संघांनी नोंदणी केली होती. त्यापैकी उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे ३० निवडक संघांना चांदवड येथे ऑफलाईन पद्धतीने दुसऱ्या फेरीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. या हॅकेथॉनसाठी विनजीत टेक्नॉलॉजीस मुख्य प्रायोजक, तर मेडिमेझ सोल्युशन सहप्रायोजक होते. स्पर्धेत कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्र शिक्षण, संवर्धित व आभासी वास्तव आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज या तांत्रिक क्षेत्रांवर आधारित आव्हाने स्पर्धकांसमोर ठेवण्यात आली. याप्रसंगी उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नितीन आहेर तसेच संस्थेचे प्रबंध समिती सदस्य रवींद्र आबड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी योगेश मोकल (इन्फोसिस, बंगळुरू), अक्षय केले (टीसीएस, पुणे), यशराज पाटील व अमोल कोल्हे यांनी मेंटर म्हणून काम पाहिले. विजेत्या संघांचा गौरव प्रथम क्रमांक मिळविलेल्या टीम कृषी इनोव्हेटर्समध्ये अनुष्का निकम, कुणाल केंदळे, ओम गांगुर्डे व लब्धी जैन यांचा समावेश होता. द्वितीय क्रमांक (प्रथम उपविजेता) टीम ऑप्टिक फ्लोच्या जयेश कदम व ललित अहिरे यांनी १० हजारांचे, तर तृतीय क्रमांक (द्वितीय उपविजेता) टीम किसान एआयच्या आर्यन जाधव, प्रसाद जगझाप व वैभव महाले यांनी ५ हजारांचे पारितोषिक मिळविले. याव्यतिरिक्त टीम संकल्प, टीम माईंडक्राफ्टर, टीम स्पिरिट, टीम त्रिनेत्र आणि टीम बग बस्टर्स या संघांना विशेष पारितोषिकाने गौरविण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *