![]()
सिल्लोड अजिंठा – वेरूळ व जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळी मधमाशा पर्यटकांवर हल्ला करत असून मानव व वन्यजीव संघर्ष सातत्याने निर्माण होत आहे. याचा थेट परिणाम अजिंठा लेणीस भेट देणाऱ्या पर्यटकांवर झाला आहे. या बाबतची कारणे, उपाय व प्रतिबंधक बाबी यांची माहिती देनारे पोस्टर सोयगाव वन विभागाच्या मानव – वन्यजीव संघर्ष समितीचे सदस्य व सिल्लोड येथील अभिनव प्रतिष्ठान चे वन्यजीव अभ्यासक डॉ. संतोष पाटील यांनी निर्माण केले आहे. सदर क्यू.आर. कोडचे विमोचन महाराष्ट्र भाजपचे अल्प संख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी, अभिनव प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण पवार,सूर्यकिरण अर्बन को. क्रेडिट सोसायटीचे सरव्यवस्थाक विजय चव्हाण, स्वराज डापके यांच्या उपस्थितीत सिल्लोड येथे करण्यात आले. मधमाशा या मानवावर हल्ला करतात तेव्हा त्यांचा डंख त्वचेत रूततो व तो न निघाल्याने त्यांची आंत्र संस्था निकामी होऊन त्यांचा मृत्यू होऊ शकतो. एका प्रकारे त्यांचा हा हल्ला आत्म घातकी हल्ला ठरतो. यास कारण आपण मनुष्य आहोत असे म्हणत आपण हरीत पर्यटन स्वीकारावे असे मत डॉ. पाटील यांनी व्यक्त केले. ईद्रीस मुलतानी यांच्या वतीने प्रत्येक हॉटेल, बस, लेनीतील महत्वाच्या जागा येथे हे पोस्टर लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अजिंठा वन परीक्षेत्र अधिकारी संतोष दोडके यांनी ही याबाबतचे पोस्टर लेणीत जागोजागी लावून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे. पर्यटनासाठी सहकार्याचे आवाहन सुरक्षित व हरीत पर्यटनासाठी आम्ही व्यापक स्वरूपात काम हाती घेतले आहे. पर्यटकांनी भडक कपडे, अत्तर, स्प्रे, ईत्यादिंचा वापर आवर्जून टाळावा. मोबाईल वर मोठ्याने गाणी वाजवू नये. याचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पर्यटकांवर परिणाम होऊ नये. निसर्ग व ऐतिहासिक स्थळ पर्यटन आनंददायी ठेवण्यास सर्वांनी सहयोग करावा. – इद्रिस मुलतानी, महाराष्ट्र भाजप अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांच्या हस्ते क्यूआर को़डचे विमोचन करण्यात आले.
Source link
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी डिजिटल कवच:वेरुळ, अजिंठ्यात महत्त्वाच्या जागी क्यूआर स्कॅन करताच मिळेल माहिती