- Marathi News
- National
- ED Arrests Punjab Minister Arora, Accused Of Money Laundering Of Rs 100 Crore, Action Taken After Raids At 55 Places
नवी दिल्ली/चंदीगड1 तासापूर्वी
- कॉपी लिंक

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी पंजाबचे उद्योगमंत्री संजीव अरोरा यांना अटक केली. अरोरा व त्यांच्याशी संबंधित संस्थांवर दाखल मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात ही कारवाई केली. ईडीने शनिवारी सकाळी अरोरा यांच्या चंदीगड येथील शासकीय निवासस्थानासह दिल्ली-गुरुग्राममध्ये ५ ठिकाणी छापे टाकले होते.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ६२ वर्षीय अरोरा तपासात सहकार्य करत नव्हते. त्यांना दिल्लीला नेले जाईल. दिल्लीतील २ परिसर व गुरुग्रामच्या उद्योग विहार येथील हॅम्पटन स्काय रियल्टी लिमिटेडच्या आवारातही झडती घेतली. सूत्रांनुसार, हे प्रकरण १०० कोटींहून अधिक रुपयांच्या मोबाइल फोनचे बनावट जीएसटी बिल आणि अवैध पैसा दुबईतून भारतात ‘राउंड ट्रिप’ साठी केलेल्या निर्यातीशी संबंधित आहे. असा आरोप आहे की बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटच्या दाव्यासाठी दिल्लीच्या बोगस कंपन्यांकडून बनावट जीएसटी खरेदी बिले मिळवली. १७ एप्रिल रोजीही ईडीने फेमाशी संबंधित प्रकरणात अरोरा व त्यांच्याशी संबंधित संस्थांवर छापे टाकले होते. हॅम्पटन स्काय रियल्टी लि., तिचे संचालक अरोरा व त्यांच्याशी संबंधित संस्थांची मालमत्ताही १९ एप्रिल रोजी जप्त करण्यात आली होती.
अरोरा यांच्यावर एप्रिलमधील कारवाई १५७.१२ कोटी रुपयांच्या कथित बनावट विक्री आणि निर्यातीद्वारे फेमा उल्लंघनाच्या आरोपाखाली करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी तपासात पूर्ण सहकार्य करू असे म्हटले होते. सत्य समोर येईल. अरोरा यापूर्वीही मनी लाँड्रिंगच्या आणखी एका प्रकरणात तपासाच्या भोवऱ्यात आहेत. २०२४ मध्ये ईडीने त्यांच्यावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर औद्योगिक जमिनीचा निवासी प्रकल्पांसाठी गैरवापर केल्याच्या आरोपाखाली छापे टाकले होते. तेव्हा ते राज्यसभा खासदार होते. पंजाबमध्ये २०२७ च्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका आहेत.
ईडी नेत्यांची भाजपत भरती करत आहे : केजरीवाल
आपचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल म्हणाले- ‘मोदी राजवटीत ईडी-सीबीआय विरोधी पक्षांच्या नेत्यांना घाबरवून भाजपमध्ये सामील करण्याचे काम करत आहेत. अरोरा यांच्यावरील छाप्यांचा उद्देशही हाच आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही केंद्रावर ईडी-सीबीआयला राजकीय हत्यार बनवल्याचा आरोप केला.